हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून वनराई बंधारे बांधणे काळाची गरज – मंडल कृषी अधिकारी अशोक नाळे

(जावली/अजिंक्य आढाव) – भारत देश हा खेड्यांचा देश आहे, आणि देशातील काही ग्रामीण भागातील शेती पावसावर अवलंबून आहे.म्हणुन पाणी अडवा पाणी जिरवा या‌ संकल्पनेतून वनराई बंधारे बांधणे काळाची गरज असल्याचे महत्व मंडल कृषी अधिकारी अशोक नाळे यांनी सांगितले.

जावली ता.येथील सिद्धनाथ ओढ्या वरील वनराई पद्धतीचा बंधारा

पाणी अडवा पाणी जिरवा’ हि आजच्या काळात खूप महत्वाची गरज आहे. सध्याच्या काळात पिण्याचे पाणी खूपच कमी कमी होत चाले आहे, याचे कारण म्हणजे आधुनिक काळात होत असलेली झाडांची कत्ल आणि वाढते ग्लोबल वार्मिंग या सर्व गोष्टींचा आपल्या पर्यावरणावर घातक परिणाम होत आहे. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा हि संकल्पना राबवणे खूप म्हत्वाचे आहे. – कृषी सहाय्यक  सतीश हिप्परकर

महाराष्ट्र शासन कृषी विभागा अतंर्गत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रत्येक गावात ओढ्या , नाल्यावरती वनराई पद्धतीचे बंधारे बांधणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले.यासाठी सिमेंटचे ,बी- बियाणे,गोळीभुसा ,पेंड यांची रिकाम्या पोत्यातून त्यांच ठिकाणी असणारे दगड गोटे वाळू गोटा यांचा भरुन दोन्ही बाजूंनी आडवी लावण्याकरता उपयोग केला जाऊ शकतो. अशा प्रकारे जावल सिद्धनाथ ओढ्या वरती हा वनराई बंधारा बांधण्यात आला आहे,या साठी जावली हायस्कूल जावली तील इयत्ता आठवी,नववी, दहावी या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून बंधारा बांधण्यासाठी योगदान दिले.या वेळी शाळेतील शिक्षक भरत निंबाळकर, वाघमोडे सर , संपत मेटकरी, ज्ञानेश्वर बुधावले, माजी. उपसरपंच सयाजी बरकडे सहभागी झाले होते.

सध्या पाऊसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी वर्गा संकटात सापडला असल्याचे दिसत आहे या साठी फलटण पूर्व भागात अशा प्रकारे बंधारे बांधण्यात यावेत, असे आवाहन फलटण उपविभागीय कृषी अधिकारी सुहास रमणसिंग व तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांच्या वतीने करण्यात येत आहे.याचा फायदा जलपातळी वाढहोवुन विहीरी, शेततळे यानां होतो.

या कार्यक्रमात बरड कृषी पर्यवेक्षक दत्ताञय एकळ, जावली हायस्कूल च्या मुख्याध्यापिका सौ बडवे मॅडम, जावली तील कृषी सहाय्यक सतीश हिप्परकर सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!