हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

वाळलेली वैरण घेऊन रस्त्याने निघालेल्या टायलीला विज वाहक तारे मुळे पेट दिड हजार पेंढी जळून खाक , टायलीचे हि नुकसान

(म्हसवड / प्रतिनिधी) संजय जगन्नाथ खांडेकर रा लोणार खडकी येथील शेतकरी आपल्या जनावरांच्या चाऱ्यासाठी वाळलेले मकवान पोलिस स्टेशन रोडने एक ट्रॅक्टर दोन टाईली मध्ये दोन टन घेऊन जात असताना मार्केट यार्ड नजिक विज वाहक तारेला वाळलेल्या वैरणीचा स्पर्श झाल्याने शर्ट सर्किट होऊन वैरणीने पेट घेऊन वैरणी सह सत्तर ते ऐंशी हजाराचे नुकसान आज सांयकाळी पावणे सहाच्या दरम्यान झाले या आगीत जीवित हानी झाली नाही.

मात्र वैरण व ट्राईलीचे मोठे नुकसान झाले घटनास्थळी पोलिस व म्हसवड पालिकेचा अग्निशमनने आग विझवली आसली तरी घटनास्थळी धुराचे लोट व बघ्यांची गर्दी मोठी झाली होती.

माण तालुक्यात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणात असल्याने जनावरांना व माणसांना ८० टॅंकरने पिण्याचे पाणी प्रशासन पुरवत आसले तरी दोन महिन्यापासून जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा डेपो, चारा छावणी सुरू करण्याची मागणी करुन हि ना सरकार लक्ष देत आहे ना जिल्हा प्रशासन लक्ष देत नाही जिल्ह्याचे पालकमंत्री आसलेले मंत्री महोदय शंभूराजे देसाई यांनी महाराष्ट्रात दुष्काळ ग्रस्त तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या माण तालुक्याकडे फिरकला सुध्दा नाहीत वा तालुक्याचा टंचाई भागाचा पहाणी दौरा हि केला नाही सहा महिन्यापूर्वी दहिवडीत आढावा बैठकीला व गेल्या महिन्यात धनगर आरक्षणाच्या उपोषणाला भेट दिली होती पालकमंत्री जिल्ह्याचे आहेत का सातारा पाटणचे असा सवाल दुष्काळ ग्रस्त करत असताना आज सांयकाळी लोणार खडकी येथील शेतकरी संजय जगन्नाथ खांडेकर हे आपल्या जनावरांसाठी एका ट्रॅक्टरच्या सहाय्याने दोन टाकली वाळलेल्या मकाची वैरण दिवस परिसरातून घेऊन खडकी या आपल्या घराकडे पोलिस स्टेशन रोडने जात असताना मार्केट यार्ड परिसरात रस्त्याला आडवी असलेली विज वाहक तारेला वाळलेली वैरणीचा स्पर्श झाल्याने वैरणीने पेट घेतला पेटलेली वैरण हे ट्रक्टर ड्रायव्हर व शेजारी बसलेल्याला कसलीच कल्पना नव्हती ५० मिटर अंतर पेटत वैरण रस्त्याने जात असताना मार्केट यार्ड परिसरात फुटाणे यांनी ट्रॅक्टर ड्रायव्हरला थांबवू वैरण पेटल्या सांगीतले ड्रायव्हर व सोबत असलेल्या एकाने व इतर नागरीकांनी टाकली व ट्रॅक्टर बाजुला करुन नागरीकांनी पालिकेचे अग्निशमनचे ड्रायव्हर प्रविण पिसे यांना कल्पना दिली म्हसवड पोलिस स्टेशनचे सपोनि राजकुमार भुजबळ पीएसआय वाघमोडे, पोलिस कर्मचारी  श्रीकुमार कुळे , ननावरे आदीनी पेटलेला वैरणीचा ट्रॅक्टर पहाण्यासाठी गर्दी केली होती ती बाजूला करत अग्निशमनने आग आटोक्यात आणली आसली तरी या आगीत वैरण व टायलीचे जवळ जवळ ऐशी हजाराचे नुकसान झाले असून याला जबाबदार असणाऱ्या विज मंडळाकडून शेतकर्याला नुकसान देण्यासाठी माणचे तहसीलदार व प्रांताधिकारी मदत करणार का ऐन दुष्काळी परिस्थितीत वार्यावर सोडणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!