हि बातमी ईतर भाषेत वाचा
माहिती व तंत्रज्ञान

पांढऱ्या सोन्याला विमा संरक्षण देण्याची शेतकऱ्यांची मागणी

गोखळी ( प्रतिनिधी): फलटण तालुका पूर्व भागात गतवर्षी पेक्षा दुप्पट प्रमाणात कापूस लागवड झाली आहे तालुक्याच्या अन्य भागात सुध्दा कपाशी लागवडीचे प्रमाण वाढले आहे.कृषी खात्याने कापूस लागवडीचे योग्य सर्वेक्षण न केल्याने या भागातील शेतकरी कापूस पिकास विम्याचे संरक्षण मिळण्याची शक्यता कमी आहे लोकप्रतिनिधीनी तालुक्यातील कापूस उत्पादकांना विमा संरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.. शेतकऱ्यांचे पांढर सोनं म्हटलं जातं त्या पांढऱ्या सोन्याच्या वेचणीचा हंगाम वेगात सुरू आहे.

कापूस वेचणीला शेतकऱ्याची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा शेतकऱ्यांच पांढर सोनं भाव खाणार काय ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.असुन ऊस गाळप हंगाम अद्याप सुरू झालेला नसल्याने ऊस तोडणी साठी आलेल्या मजुरांचा कापूस वेचणीला हातभार लागत आहे आहे. कापूस वेचणीला मजुरांची चणचन ऊसतोड मजुरांनी. भरुन काढली आहे. सध्या निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेऊन कापूस पिकाची शेती फायदेशीर मानली जाते.. मात्र दराची चिंता लागून राहिली आहे. सन २०२०-२१ मध्ये बारा ते तेरा हजार रुपये क्विंटल दराने कापूस दर निघाला होता.गेला.मात्र गतवर्षी कापसाचे मार्केट निम्म्याने खाली आल्याने.यावर्षी शेतकऱ्यांचे कापसाचे मार्केट काय राहील याची चिंता लागून राहिली आहे. कपाशी वेचणीला वेग आला असून दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस दराची कोंडी फुटणार काय? याकडे कापूस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे. यावर्षी कापूस लागवडीसाठीचा खर्च वाढला , त्यात यावर्षी कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्न कमी येणार आहे. यंदा कापसाच्या हंगामामध्ये पाऊस खूपच कमी पडला यामुळे कपाशीची म्हणावी तशी वाढ झाली नाही.पिकावर रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव देखील दिसून आला यामुळे उत्पन्नावर विपरीत परिणाम होत आहे. दरवर्षीपेक्षा कापूस वेचणीचा दर सुद्धा जादा आहे.त्यात यंदा केंद्र सरकारने कापसाच्या गाठी आयात केल्याचे समजते यामुळे देखील दरावर विपरीत परिणाम.होईल अंशी शंका शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. कापसाचे सरासरी उत्पन्न गेल्या वर्षी 15 ते 18 क्विंटल पर्यंत होते ते यावर्षी आठ ते दहा क्विंटल येईल असे शेतकऱ्यांनी सांगितले कापसाची एस एम पी फारशी. वाढलेली नाही विदर्भ मराठवाडा देखील कापसाचे पीक हातचे गेले आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील. कापसाला मागणी वाढण्याची शक्यता आहे फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात एक दिड हजार एकरा पेक्षा जादा लागलड झाली आहे पण कृषी खात्याने योग्य नोंदणी न केल्याने फलटण तालुक्यातील शेतकरी कापूस पिक विमा संरक्षणा पासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे तालुक्याच्या लोकप्रतिनिधी कापसाच्या पिकासाठी विमा संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे. कापूस उत्पादक.अजित धुमाळ व विकास घोरपडे यांनी केली आहे.कापूस वेचण्यासाठी. मजुरांची टंचाई मुळे बाहेरगावावरुन आठ दहा कि.मी. अंतरावरुन मजुरांना भाडोत्री वाहनाने आणावे लागते. कपाशी पिकाला दर चांगला मिळत असला तरी.बियाणे, औषधे आणि मजूरी च्या खर्चात वाढ झाली आहे. यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने विदर्भ मराठवाड्याच्या अनेक भागात कापूस लागवड क्षेत्र घटले असल्याचे बोलले जात असल्यामुळे कापसाला चांगला समाधानकारक दर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.ऊस पिक हातात येण्यासाठी जवळपास १५-१६ महिने लागतात तद्नंतर साखर कारखान्याचा हंगाम सुरू होऊन ऊस गेल्यानंतर पूर्ण पैसे हातात पडण्यासाठी वर्षे भर वाट पाहावी लागते कापशी पिकास चार -पाच महिन्या कालावधी लागतो कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून कपाशी पिकाकडे पाहिले जाते.कापूस पिकातून जमिनीचा पोत चांगल्या प्रकारे राखता येतो.आणि त्या पिकातून पैसाही मिळवता येतो कमी पाऊस सात आठ पाण्यात पिक येते या उलट ऊसाच्या वारंवार पिक घेण्यामुळे जमीनीचा पोत बिघडतो सतत पाणी दिल्याने जमीनी लोणकट बनतात कालांतराने शेती उत्पादनात घट निर्माण होते.‌कपाशी पिकामुळे पाणी बचत,जमीनीची प्रत खराब होत नाही कमी कालावधीत पैसे मिळवून देणारं पिक म्हणून कपाशी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे ‌.फलटण तालुक्याच्या पूर्व भागाबरोबरच आता तालुक्याच्या अन्य भागात कपाशी लागवडीचे क्षेत्रात जवळ पास सुमारे एक हजार एकराच्या पेक्षा जास्त पर्यंत पोहचले असण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना तालुका पातळीवर कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी गतवर्षी पासून केली जात आहे. ती मागणी यावर्षी तरी पूर्ण होईल का ? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!