आपला जिल्हा
खटाव – भूरकवडी रस्त्यावर एस टी व मोटारसायकलीची धडकेत कुकूडवाडचे ; गणेश काटकर याचां मृत्यू तर एस टी मधील १५ जखमी
(म्हसवड/ प्रतिनिधी) खटाव – भूरकवडी रस्त्यावर कारीचा मळा शिवारात, जाधव लवणा लगत एस टी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन या अपघातात माण तालुक्यातील कुकूडवाड येथील दुचाकी स्वार गणेश तानाजी काटकर (वय ३८) याचा जागीच मृत्यू झाला. तर एस टी बस मधील १५ प्रवाशी जखमी झाले.आसून त्या सर्व जखमींना वडील येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अधिक तपास पुसेगाव पोलीस करत आहेत.
काटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर…
गणेश काटकर वडूज येथे ज्वेलरी व्यवसाय करत होता. तो दररोज कुकुडवाड ते वडूज असा प्रवास करत होता. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, १ मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे