आपला जिल्हा
आंधळीत पूर्वीच्या वादातून सख्या चुलत भावाकडून भावाचा व भावजयचा खून ; चार तासात आरोपी अटक

(म्हसवड/ प्रतिनिधी ) : आंधळी ता माण येथील पती पत्नी यांचा शनिवारी मध्यरात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या संजय रामचंद्र पवार (वय ४९ वर्षे) व मनिषा संजय पवार (वय ४५ वर्षे) या दाम्पत्याचा पूर्ववैमशातुन सख्या चुलत भावाने धारधार शस्त्राने मानेवर वार करुन खून केल्याची भयंकर घटना घडल्याचे रविवारी सकाळी निदर्शनास आल्यावर पोलीस पाटील यांनी दहिवडी पोलिसांना या बाबत माहिती दिली नंतर दहिवडी पोलीसानी सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व डाॅग स्काॅड यांना पाचारण करून पती पत्नीचा दुहेरी खुन करणार्या आरोपीचा शोधासाठी फलटण,दहिवडी आदी ठिकाणी पथके पाठवून तपासाची गती वाढवून आरोपीला काही तासातच जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व दहिवडी पोलिसांना यश आले.
