हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

माण तालुक्यातून हजारो वंचित बहुजन प्रेमी प्रकाश आंबेडकर यांच्या संविधान जागृत सभेला उपस्थित राहणार – युवराज भोसले

(म्हसवड/ प्रतिनिधी) : देशभरातील वंचित असलेल्या घटकांच्या मधील मन, मेंदू अन मनगटात दहा हत्तीचे बळ निर्माण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची शनिवारी साताऱ्यात ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता गांधी मैदान येथे भव्य सभेचे आयोजन संविधान जनजागृती विचार मंच सातारा यांच्या वतीने करण्यात आले असून ही सभा सातारातील ऐतिहासिक होणार असेच चित्र असून माण तालुक्यातील प्रत्येक गावात गावातुन या सभेला नागरिक महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष युवराज भोसले यांनी सांगितले.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जल्लोषात होऊन गेला मात्र या देशातील शोषित, पिडीत, वंचितांच्या जगण्याला आजही न्याय मिळत नाही. उलट दिवसेंदिवस अन्याय, अत्याचार अन सांस्कृतिक दहशतवादाने सर्वसामान्य बहुजनांचे जगणं मुश्किल होऊन जात आहे. मराठा आरक्षणासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या महिला, अबाल वृद्धावर जीवघेणा हल्ला करुन माणुसकीला काळीमा फासणारी घटना, धनगर आरक्षण हि लोंबकळत ठेवून समाजा मता पुरता वापर करत आहेत हे समाजाला कळून चुकले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या नांदेडच्या युवकाला ठार केले, साताऱ्यातील पानवाण येथे मातग महिलेला भर चौकात निर्दयपणे मारहाण करण्यात आली, पुसेसावळीत जातीय दंगल घडवून निष्पाप मुस्लिम युवक नुरुल हसनला जीवे मारले गेले येथील धर्मस्थळावर हल्ला चढवून समाजमन क्लूषित केले, वर्धनगड बनवडी येथील मुस्लिम निष्पापांना घरात घुसून जीवे मारण्याचे उद्देशाने हल्ला केला थोडक्यात धर्म आणि जातीच्या नावाखाली सांस्कृतिक दहशतवाद माजवून मराठा,दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, ओबीसीच्यावर जुलुम सुरू केलाय त्यामुळे या देशात संविधान स्वातंत्र्य आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय इथली मनुवादी व्यवस्था सत्तेच्याचाव्या हाती घेऊन पावलोपावली संविधानाची पायमल्ली करताना दिसत आहे आज देशातील एकता आणि एकात्मता धोक्यात आहे. जात अन धर्माच्या नावाखाली काही विघातक शक्ती सामाजिक सलोखा बिघडविण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. गुंड, जातदांडगे अन धनदांडगे यांनी संसदेत घुसखोरी करून लोकशाही खिळखिळी केलीय. ओबीसिंचे सामाजिक , राजकीय आरक्षण धोक्यात आणले आहे.

गरीब मराठा, शेतकरी, श्रमिक-कष्टकरी जनतेला कोणी वाली राहिला नाही. अशावेळी आपण सर्वांनी सतर्क होऊन संविधानातील न्याय, हक्क, अधिकारासाठी, शोषित, पिडीत, वंचितांच्या संरक्षणासाठी, संविधान बचावासाठी एक व्हायला हवे, नव्हेतर ही काळाची हाक आहे. त्याचाच एक भाग म्हणून सातान्यात ७ ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य समेचे आयोजन करण्यात आले. तेव्हा ‘हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है उदघोषणा’ अधिक मजबूत ‘करण्यासाठी या सभेला माण तालुक्यातील गावा गावातून हजारो वंचित बहुजन प्रेमी या सभेला उपस्थित राहणार आहेत असे माण तालुकाध्यक्ष युवराज भोसले यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!