हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

भाजपा च धनगर व मराठा समाजाला आरक्षण देणार…! म्हसवडच्या मायमाऊलींची पाण्याची वनवन या नव्या योजनेने थांबणार – ना. विखे पाटील

दोन महिन्यांत म्हसवडला तहसील कार्यालय सुरू होणार

(म्हम्हसवड /प्रतिनिधी) : – ८० कोटीच्या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे म्हसवडच्या मायमाऊलींची आठ दहा दिवसातून एकवेळ येणाऱ्या पाण्याची वनवन थांबणारी हि महत्वकांक्षी केंद्र सरकारची पाणी योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन २०२४ पर्यंत देशातील सर्व घरात नळाचे पाणी गेले पाहिजे हे केंद्र सरकारचे नियोजन असून या केंद्राच्या योजनांवरील मधूनच म्हसवड पालिकेच्या ८० कोटीच्या सुधारीत नळपाणी पुरवठ्यास निधी साठी पाठपुरावा तुमच्या भागाचा लढवय्या नेता जयकुमार गोरे यांनी मरणाच्या दारातून बाहेर आल्यावर आणला आहे हे विसरू नये आमचा विरोधक राज्यातील मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणावरुन सतत गरळ ओकत असले तरी आरक्षणाचा प्रश्न फक्त गेले कित्येक वर्षे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री राहिलेले व स्वताला “जाणता राजा” म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांनी महाराष्ट्रातील मतदारांचा केवळ वापर करून घेतला त्यावेळी आरक्षण का दिले नाही , असा घानाघाती आरोप करुन ना विखे पाटील म्हणाले मराठा व धनगर या दोन्ही समाजाला आरक्षण भाजपाच देवू शकते असे म्हसवड येथील जाहीर सभेत राज्याचे महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

काल सभे दरम्यान दिवसभर पाऊस पडत होता तरी ही या कार्यक्रमास लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

पोलिस यंत्रणा छत्री , रेनकोट घालून बंदोबस्त करत होती तर डिवायएसपी मॅडम स्वता प्रत्येक पॅईन्टवर जाऊनकर्मचार्याबरोबर सेल्फी काढताना दिसत होत्या, तर म्हसवडचे सपोनि राजकुमार भुजबळ व दहिवडी सपोनि सोनवणे चालत बंदोबस्ताची पहाणी करत होते.
सकाळी दहा गावची गजी पथके आपले कार्यक्रम सादर करत होते याचे सुत्रसंचालन सजगने यांनी केले
शेकडो महिलांसह म्हसवड शहरातील प्रमुख मंडळीनी शहरातुन जल कुंभ रॅली काढली होती
या सभेला हलगी वाजवत लोक येत होते.
या कार्यक्रमात अनेकांनी भाजपात प्रवेश केला
धनगर समाजा तर्फे ना विखे पाटील घोंगडे काठी व भंडारा लावून सत्कार धनगर समाजातील मंडळीनी केला.

विकास कामांचे अनावरण उदघाटन मंत्रीमहोदयाच्या हस्ते करण्यात आले.

माण खटाव च्या आ.जयकुमार गोरे यांनी म्हसवड नळ पाणीपुरवठा योजना व शहर व परिसरातील रस्ते, गटार बांधकाम, समाज मंदिर, सुशोभीकरण, सभागृह आदी विकास कामे मंजूर करुन आणत त्या सर्व कामाचे भुमिपुजन ना विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी या कार्यक्रमास खा. रणजितसिंह निंबाळकर, आ. राहुल कुल, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम, मनोज घोरपडे , सोनिया गोरे , तालुका अध्यक्ष शिवाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, नितीन दोशी, विजय धट, माजी नगरसेवक डॉ. वसंत मासाळ, इंजि. सुनील पोरे , धनाजी चव्हाण, भाजप शहराध्यक्ष बी. एम. अबदागिरे, लुनार विरकर, अकिल काझी, शंकर विरकर , संजय भागवत , अॅड भास्करराव गुंडगे , अर्जुन काळे , बाळासाहेब मासाळ , आदी प्रमुख उपस्थित होते.

म्हसवड येथील कार्यक्रमात बोलताना माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे

यावेळी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले पहिल्यांदा मी सिध्दनाथ चरणी नतमस्तक होतो पावसाचे हि आभार मानतो अजून जोरात येऊ द्या व या भागाचा दुष्काळ हाटू दे  पाऊस नसल्याने तुमच्या सारखी महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर झाली होती महाराष्ट्रातील अनेक गावात पाणी टंचाई जनावरांना चारा नाही हि विदारक परिस्थिती असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि हि परिस्थिती व्यवस्थित हातळत असताना परमेश्वराचे खरेतर आज आभार मानायला हवेत, माण- खटाव सह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्याने पश्चिम महाराष्ट्रातील धरणे यंदा भरली नव्हती परतीच्या पावसाने सरकार ला काहीसा दिलासा दिला आहे. नाहीतर पुन्हा दुष्काळाची टांगती तलवार सरकारसमोर होती मात्र ती वेळ आता येणार नाही. निसर्गसुध्दा आमच्या पाठीशी आहे देशाचे पंतप्रधान मोदी जी यांच्या “सबके साथ सबका विकास” या योजनेच्या माध्यमातून कोव्हीड नंतर च्या काळात राज्यातील परिस्थिती हाताळताना १ रुपयात पिक विमा योजना शेतकर्यांसाठी आम्ही राज्यात राबवली आहे या मुळे शेतकर्यांना त्याचा ९० टक्के लाभ झाला आहे. मा. फुले जन आरोग्य योजने तुन मोफत सामान्य जनतेला लाभ होत आहे. राज्यातील १२ कोटी जनतेला आयुष्मान भारत योजने तुन ५ लाख रुपयांची वैद्यकिय मदत करण्यात येत आहे. मागील सरकार ने फक्त आश्वासने दिली मात्र मोदी सरकार ने सामान्य जनतेला कोरोना  नंतरच्या काळात मोफत लस मोफत धान्य दिले. आज ही ८० टक्के नागरीकांना मोफत धान्य दिले जात आहे. सबका साथ सबका विकास हा मुलमंत्र घेवुन देशभरात विकासकामे पंतप्रधान यांच्या नेतृत्व व कर्तृत्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. यापुर्वीच्या जिहे कटापूर, उरमोडी , टेंभु या पाणी योजना का पूर्ण केल्या नाहीत मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्न फक्त भाजपच सोडवु शकते याची खात्री विरोधकांना पटल्यानेच विरोधक आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्य शासनाला सतत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र या दोन्ही समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप कटीबध्द आहे
म्हसवड परिसरातील गावांना दहिवडी जावे लागते त्यासाठी म्हसवड शहरात नवीन सब तहसिल कार्यालय सुरु करण्या बाबत केलेली मागणी आज पुर्ण करण्याचा शब्द देतोय दोन महिन्यात शहरात नवीन तहसिल कार्यालय सुरु करण्या बाबत प्रांताधिकारी यांना आदेश करत आहे असे ना विखे पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रस्तावित भाषा करताना आ जयकुमार गोरे यांनी सुरुवात भावनीक करत उपस्थितांची मने जिंकली म्हणाले माझेवर सतत वडिला प्रमाणे प्रेम करणारे वेळो वेळी सबुरीचा व महत्त्वाचे सल्ले आणि विचार सांगणारे व म्हसवडवर नेहमी प्रमाणे करणारे ना विखे साहेब गेल्या आठ दिवसापूर्वी म्हणाले मंडप काढला का मी नाही म्हटल्यावर चौथ्या वेळी कार्यक्रम दिला मला तुम्हालाच या भुमिपुजन सोहळ्यास आणुन म्हसवड शहराला तहसीलचा दर्ज मिळवून देण्यासाठीच घेतला आहे कारण म्हसवडच्या जनतेने मला प्रत्येक निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने निवडून दिले त्यामुळे म्हसवड शहराला एक मॉडेल सिटी बनवण्यासाठी शहरातील रस्ते, गटारीचे कामे महात्मा फुले पुतळा परिसरातील सुशोभीकरण, शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा, अहिल्याबाई होळकर यांचे नावे शॉपिंग काॅम्पलेस व पूर्णाकृती पुतळा, महात्मा गांधींचा पुतळा, डॉ बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे यांचे पुतळे शहरात उभे करणार आहे शहराच्या विकासासाठी बारा कोटीचा निधी आणला उर्वरित कामासाठी अजून पन्नास कोटीचा निधी शहराच्या विकासासाठी आणणार स्वताला अधिकारी म्हणून घेणारे राष्ट्रवादीचे नेते यांनी त्यांच्या हातात पाच वर्षे सत्ता होती किती निधी पालिका विकासासाठी आणला शहर भकास करण्याचे काम करुन म्हसवड म्हसवडच्या जनतेला १०/१२ दिवसातून एकवेळ काळे, निळे, हिरवे पाणी पाजले येणाऱ्या निवडणुकीत त्यांना जनताच जागा दाखवेल एम आय डी सी बाबत बोलताना म्हणाले रामराजे जे बोलतात त्याच्या विरोधात आज पर्यंत करत आले आहेत म्हसवडला एम आयडी होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केला. साडे तिनशे कोटीचा हा प्रकल्प साठे आठ हजार एकरावर होत असताना जमिन मालकांची माथी भडकावून जमिनी द्यायला विरोध या भागातील शेतकरी राजाने केला कारण माणदेशी माणूस हा जमिनीवरचा आहे जमिनीवर प्रेम करणारा आहे त्यामुळे ते जमिनी देण्यास टाळाटाळ करत होता त्या सर्व माझ्या बांधवावर अन्याय होऊ देणार नाही मला नाथ बाबा, नागोबा आशिर्वाद आहे त्यामुळे विरोधकांच्या छाताडावर बसून सर्वाचा विरोध मोडून एम.आयडीसी म्हसवडातच उभी करणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारे पाणी जुलै मध्ये हिंगणी पर्यंत जिहेकटापूर चे बिजवडी मोगराळे या १८ गावांना १.१ टीएमसी पाणी जादा मिळणार आहे जिहे कटापूर व टेंभु योजनेच्या पाण्याचे फेर वाटप होऊन ४४ गावातील लोकांना या अडीच टीएमसी मिळणार आहे ज्या माण खटाव मध्ये १५ वर्षापूर्वी माळावर कुसळ होती त्या माण खटाव मध्ये जिहे कटापूर, उरमोडी, टेंभु या योजनेचे पाणी आल्याने ऊस पिकूची लागला आहे , नव नवीन शेतात प्रयोग होऊ लागले आहेत सफरचंद, डाळी, मोसंबी पिकू लागली आहे हे पाणी आल्यावर चित्र निर्माण केले हा कार्यक्रम होऊ नये यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले होते , मंडप काढला का, पाऊस आहे हा अपप्रचार विरोधकांनी केला पण माझ्या म्हसवडच्या माय माउलींच्या पाण्यासाठी हा कार्यक्रम होता त्यामुळे ताकतीने हा कार्यक्रम करण्याचा निर्धार म्हसवडच्या महिलांनी व तरुणांनी आणि माझ्यावर प्रेम करणार्या कार्यकर्त्यांनी केला.

धनगर व मराठा समाजाला आरक्षण मिळावे याचा विचार आज पर्यंत केला नाही मते मिळवण्यासाठी या दोन्ही समाजाला खेळवण्याचे काम केले ते सत्तेवर असताना आरक्षणाची मागणी कोणीच केली नाही आज जी उपोषणे, आंदोलने मागणीसाठी होत आहेत हे राष्ट्रवादीचे काम आहे आमचे सरकार आल्यावरच मोर्चा रस्ता रोको उपोषणाला लोक भडकवण्याची कम केले तरी भाजप सरकारच्या या दोन्ही समाजाला आरक्षण देणारच यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे असे मत आ जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या वेळी आ राहुल कुल, खा रणजितसिंह नाईक निंबाळकर, सुनिल पोरे , विजय धट यांनी विचार व्यक्त केले तर आभार शिवाजीराव शिंदे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!