हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

गोखळी गावातील अवैध व्यवसाय बंद करण्याची व्यसनमुक्त संघाची मागणी

 गोखळी ( प्रतिनिधी): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी गावामध्ये शासकीय नियमाप्रमाणे बंद असलेली गुटखा विक्री राजरोसपणे चालू आहे ती पूर्ण पणे बंद करण्यात यावी तसेच इतरही अवैध व्यवसाय मटका आणि जुगार चालू आहेत प्रशासनाने लक्ष घालून बंद करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त युवक महिला आघाडीच्या वतीने महिलांच्या हस्ते गावच्या सरपंच , पोलिस पाटील यांना २ ऑक्टोबर महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने देण्यात आले.

सविस्तर निवेदन पुढील प्रमाणे १९ जुलै २०१२ रोजी प्रकाशित शासकीय नियमावली प्रमाणे गुटखा उत्पादन, साठवणूक,वितरण आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली असताना गोखळी गाव आणि परीसरात गुटखा विक्री राजरोसपणे सुरू आहे.त्याच बरोबर अवैध प्रकार मटका, जुगार चालू आहे ‌‌असे अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.या.निवेदनाच्या प्रती मा जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक सातारा, प्रांताधिकारी फलटण, उपविभागीय पोलिस अधिकारी फलटण, तहसीलदार फलटण, संस्थापक युवक मित्र ह.भ‌.प. बंडा तात्या कराडकर, व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष दीपक जाधव, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता साहेब यांना माहिती साठी देण्यात आले आहे. ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच सौ स्वप्नाली गावडे, ग्रामविकास अधिकारी गणेश दडस, पोलिस पाटील विकास शिंदे, खटकेवस्ती चे पोलिस राजेंद्र धुमाळ यांनी निवेदन स्वीकारले.गोखळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार गावात सर्व दुकानदार,पान टपरी धारक यांना गुटखा बाळगणे व विक्री बंद करण्यात यावे यासाठी लेखी पत्र दिले जाईल त्यातूनही विक्री बंद केली नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल गोखळी गावातील युवकांनी २५ वर्षांपूर्वी दारु गाळणे व विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आजपर्यंत बंदी आहे यापुढे सुरू करण्याचे कोणी धाडसही करणार अशाच पध्दतीने गावातील अवैध व्यवसाय बंद करण्याची कार्यवाही करु असे ग्रामपंचायतीचे वतीने आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुजन करून अभिवादन करण्यात आले.क.याप्रसगी ह‌‌भ‌‌प.सुजित गावडे महाराज म्हणाले की , गावागावात राजरोसपणे दारू, गुटखा , मटका, जुगार चालू असल्याने आज देशाची भावी पिढी म्हणून ज्याच्या कडे आशेने पाहत आहोत हजारो तरुणांना मध्ये व्यसनाधिनतीचे प्रमाण वाढत आहे शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक नुकसान होत आहे. व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने.महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त प्रथम सर्व प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी यांना निवेदन देण्यात येत आहे.कार्यवाहीची वाट पाहू त्यानंतर पुढील निर्णय व्यसनमुक्त युवक संघ घेईल असे सांगितले. कु.प्राची किर्वे लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले..यावेळी व्यसनमुक्त युवक संघ महिला आघाडी महिला, हनुमान माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थ, व्यसनमुक्त युवक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ‌.आभार सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!