(जावली/अजिंक्य आढाव) – पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करून मारहाण शिवीगाळ करणे तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले प्रकरणी जाधववाडी ता माण येथील एकावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे , केशव शिवाजी जाधव असे त्याचे नाव असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
दहिवडी पोलिसांचे कर्मचारी सुधीर गंगाधर करचे (वय 28) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार केशव शिवाजी जाधव राहणार जाधवाडी पोस्ट बिजवडी ता. माण यांने दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना फोन करून मी आज खून करणार आहे, असे सांगितले होते नेमकं काय प्रकार आहे याची खात्री करण्यासाठी वरिष्ठांच्या सांगण्यानुसार पोलीस कर्मचारी सुधीर करचे शासकीय वाहनांवरील चालक व होमगार्ड कुंडले हे त्यांच्या च्याबरोबर त्या ठिकाणी गेले दहिवडी – फलटण रस्त्यांवर बिजवडी येथे ढाबा परिसरात किशोर जाधव त्यांना भेटला त्यावर मीच साहेबांना फोन केला होता असे केशव जाधवने सांगितले त्यावर सुधीर करचे यांनी विचारणा केली असता केशव ने पोलिसांनी का सोडून दिले..? पोलिसांचा पण खून करणार असे वक्तव्य केले , केशवने पोलीस कर्मचारी सुधीर करचे यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला पोलीस गाडीच्या मडगार्डवर लाथामारून मोडतोड करून चौकशी साठी गेलेल्या दहिवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्याशी उद्धट वर्तन केले , याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.