(गोखळी /प्रतिनिधी ): गेल्या अनेक वर्षांपासून फलटण पंचायत समितीची “आमसभा ” झालेली नाही तरी सदर आमसभा त्वरित घेण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे यांनी केली आहे.
आमसभा म्हणजे तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध विकास कामांचे रखडलेल्या प्रश्नांवर आवाज उठवून ते प्रश्न सोडविण्यासाठी एकमेव व्यासपीठ आहे.फलटण तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम साहेब यांच्या कार्यकालावधीमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली दर वर्षी आमसभा घेण्याचा प्रता होती. आमसभेतील चर्चेतून लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिक यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात मात्र हे प्रयत्न आज दिसत नाही निवडून गेल्यानंतर लोकप्रतिनिधी सामान्य नागरिकांना संपर्कात रहात नाहीत यामाध्यमातून किमान वर्षातून एक वेळ संपर्क साधला जातो. आमसभा हे कार्यकर्त्या घडविणारी कार्यशाळा आहे गावोगावचे सरपंच , सामान्य जनता सभेत आपल्या भागाच्या अडीअडचणी मांडण्याचे प्रयत्न करतात .यानिमित्ताने यासाठी तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी त्वरित आमसभा घ्यावी असे आवाहन पै बजरंग गावडे यांनी केले आहे.