(जावली/अजिंक्य आढाव) शेअर मार्केट बद्दल सर्वांना माहिती मिळावी या उद्देशाने क्लासिक ट्रेडर्स मार्फत IIFL चे सब ब्रोकर मंगेश अभंग यांचेमार्फत हॉटेल रेड स्टोन, कोळकी, ता. फलटण मध्ये सेमिनार पार पडले. या मध्ये मंगेश अभंग यांनी भारतीय शेअर बाजाराचे महत्व सांगून गुंतवणुकीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. शेअरमार्केट बद्दल लोकांच्या मनात विविध संभ्रम आहेत ते स्पष्ट करण्यात आले.
शेअर मार्केट बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लोकांच्या मनात आहे ते काल जमलेल्या गर्दीतून स्पष्ट होत आहे.
शेअर मार्केट हा साईड बीझनेस आहे यामध्ये गुंतवणूक करणे ही काळाची गरज आहे. असे सांगून एस.आय.पी.आय.पी.ओ, पी.एम.एस. सर्व्हिस याबद्दल मार्गदर्शन केले. शेअर मार्केट बद्दल सर्वांना नॉलेज घेणे किती गरजेचे आहे ते देखील या सेमिनार मध्ये स्पष्ट केले. फलटण मध्ये सर्वत्र पाऊस चालू असूनही बरीच लोकं बाहेर गावावरूनही माहिती घेण्यासाठी जमा झाली वालचंदनगर , नातेपुते , बारामती, लोणंद या ठिकानाहून लोकं फलटण मध्ये सेमिनार साठी उपस्थित राहिली. त्याबद्दल क्लासिक ट्रेडर्स च्या वतीने स्नेहभोजन आयोजन करण्यात आले होते, उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.
क्लासिक ट्रेडर्स चे ऑफिस डी एड चौक फलटण या ठिकाणी असुन या ठिकाणी शेअर मार्केट चे क्लासेस चालवले जातात. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑफिस ला भेट द्यावी
पत्ता – स्वरा हाइट्स बिल्डिंग प्रेमाचा चहा शेजारी डी एड चौक फलटण
संपर्क : मंगेश अभंग 9730991092