(जावली/अजिंक्य आढाव) – फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत दि १९/९/२०२३ रोजी विडणी ता.फलटण गावचे हद्दीत निरा उजवा कॅनॉल मध्ये अनोळखी मयत मिळून आले होते तपासा मध्ये सदर येथे फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अजित बुरुंगले याचे असल्याचे निष्पन्न झाले.
त्याप्रमाणे अनोळखी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासामध्ये सदर गुन्हा फलटण पोलीस शहर ठाणे येथे घडल्याने वर्ग करण्यात आला होता. तपासामधे सदरचा गुन्हेतील आरोपी करण विठ्ठल भोसले यास फलटण शहर पोलिसांनी पकडले होते. तेव्हापासून गुन्हांयातील दुसरा आरोपी राहुल उत्तम इंगोले रा. लोहगाव पुणे हा फरारी होता. फलटण ग्रामीण पोलीस ठाणे स्टेशनची टीम सदर आरोपीच्या मागावर होती. त्याप्रमाणे व तांत्रिक विश्लेषण करून आरोपीस ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्यांची कबुली दिली आहे त्याप्रमाणे आरोपीस पुढील तपासकामी फलटण शहर पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिली आहे.
सदर कामगिरी मा. समीर शेख सो पोलीस अधीक्षक , मा. बापू बांगर अप्पर पोलीस अधीक्षक , मा. राहुल धस पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक मा. सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे , पोलीस नाईक नितीन चतुरे , अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत खरात , हनुमान दडस यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.