(गोखळी/ प्रतिनिधी ) : – कार्यसम्राट माजी सरपंच नंदकुमार (मामा )गावडे युवा मंच गोखळी च्या वतीने खास गौरी गणपती उत्सवानिमित्त गोखळी कार्यक्षेत्रातील महिलांसाठी गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये पूनम संजय घाडगे यांनी साकारलेल्या ” वटपौर्णिमा” देखावा यांस प्रथम क्रमांक, प्रतिक्षा रोहित गावडे यांनी साकारलेल्या” जेजुरी गड “देखाव्यास व्दितीय क्रमांक तर गौरी सोमनाथ गावडे यांनी साकारलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र सरकार पुरस्कृत महिला बचत गट व महिलांसाठी लघु उद्योग ( FPO,FPC ) योजना देखावा तृतीय क्रमांक मिळाला या स्पर्धेमध्ये १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला उर्वरित स्पर्धकांना उत्तेजनार्थ रोख बक्षीसे जाहीर करण्यात आली.
या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून संजयकुमार बाचल , डॉ अमित गावडे, राजेंद्र भागवत यांनी काम पाहिले.विजेत्या स्पर्धकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.