गोखळी ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य लोहार समाज व सकल लोहार समाज सातारा जिल्हा अंतर्गत फलटण तालुका लोहार समाज संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल सदाशिव हरीहर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेची बैठक महाराष्ट्र राज्य लोहार समाज संघटना जिल्हाध्यक्ष हनुमंत रघुनाथ चव्हाण सर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणी सदस्य भगवान हरीहर , माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब वसव यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी फलटण तालुका अध्यक्षपदी अमोल हरीहर यांची निवड करण्यात आली.
यावेळी तालुका कार्यकारिणी मध्ये नवनाथ थोरात, हणमंत हरीहर ( आदंरुड), सुरेश पवार (पवार वाडी) , ज्ञानदेव हरीहर (गोखळी) , दिनकर वसव ( निभोंरे ) , लक्ष्मण तात्या टिंगरे (कोळकी) , पवार सर ( गिरवी ) दिलीप हरीहर (गुणवरे), मोहन टिंगरे (फलटण ), दादासाहेब हरीहर ( गोखळी), विशाल कळसाईत यांची निवड करण्यात आली.यानिवडीबद्दल अमोल हरीहर यांचे विविधस्तरावरुन अभिनंदन होत आहे.