(जावली/अजिंक्य आढाव)- फलटण पूर्व भागातील जावली गाव एक आदर्शवत बनविण्याच्या दृष्टीकोणातुन वाटचाल करत आहोत, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात येणार असून पुढील येणाऱ्या काळामध्ये ग्लोबल वॉर्मिंग पासून बचाव केला जाईल.वाढते तापमानामुळे अनियमित पाऊस पडुन लागला , येणाऱ्या काळामध्ये जावली गावात मोठ्या प्रमाणात जंगल दिसतील. जावली गावातील शेतकऱ्यांना विविध पिकं उत्पादनाबाबत वेळोवेळी आय.आय. केअर फाऊंडेशन च्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे .गावच्या विकासासाठी राजकारण विसरून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. असे जिल्हा परिषद मा.अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर कार्यक्रमा वेळी म्हणाले.
जगात दिवसेंदिवस पृथ्वीचे तापमान वाढत आहे. ग्रीनहाऊस वायू (कार्बन डाय ऑक्साईड, पाण्याची वाफ, नायट्रस ऑक्साईड, आणि मिथेन) पृथ्वीवरील वातावरणात उष्णता वाढवण्यास कारणीभूत आहेत. हे बर्याच लोकांना, प्राणी आणि वनस्पतींना इजा करते.
ग्लोबल वार्मिंगची अनेक कारणे असू शकतात, परंतु प्राथमिक आणि मुख्य कारण म्हणजे ग्रीनहाऊस इफेक्ट. हा परिणाम मुख्यत: कार्बन डाय ऑक्साईड, मिथेनक्लोरोफ्लोरोकार्बन, नायट्रस ऑक्साईड इत्यादी वायूंमुळे होतो.
कार्यक्रमा वेळी जिल्हा परिषद केंद्र शाळा जावली व हेकळवाडी जिल्हा परिषद शाळा जावली, हायस्कूल व राॅयल इंग्लिश स्कूल जावली यांना सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संगणक वाटप करण्यात आले.
फलटण पूर्व भागातील जावली गावात आय.आय. केअर फाऊंडेशन च्या मदतीने 15 लाख वृक्षारोपण करण्याचे उदिष्ट असुन त्याची वाटचाल सुरू आहे
प्रमुख पाहुणे म्हणून आय.आय केअर सामाजिक संस्थेचे संचालक श्री डाॅ. संतोष भोसले श्रीमंत सत्यजित राजे निंबाळकर सरपंच सुरेखा बुधावले, माजी सरपंच ज्ञानेश्वरी मकर, तुकाराम बरकडे, अजिंक्य पाटील,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर ईंगवले यांनी केले तर रावसाहेब निंबाळकर यांनी आभार व्यक्त केले,या वेळी ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थ्यांना, शिक्षक, उपस्थित होते