हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

सोनपावलांनी आली गौराई ; जावली ता. फलटण येथील भिसे कुटुंबीय महिलांनी साकारला झोपाळ्यावरील गौरी गणपती सजावट देखावा

(जावली/अजिंक्यआढाव)लाडक्या गणरायापाठोपाठ लाड पुरवून घेण्यासाठी गौराई चे स्वागत जावली ता. फलटण येथील भिसे कुटुंबातील सदस्यांनी गौराई आली सोनं पावलांनी..!

वृक्ष संवर्धन काळाची गरज असलेला देखावा

गौराई आली माणिक मोत्यांच्या पावलांनी म्हणत या माहेरवशीनि च्या साजशृंगारासह तिचे लाड पुरवण्यासाठी महिलांची लगबग पाहायला मिळाली. भाग्योदय उद्योग समूहाचे भिसे कुटुंबातील सर्व सदस्य यांच्या माध्यमातून व्यवसाया बरोबरच मैत्री व जिव्हाळ्याचे संबंधातुन लोकांशी नातं जपलं आहे.

छोपाळया मध्ये झोका घेणाऱ्या गौरी

गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा असलेल्या बाप्पाच्या आगमना बरोबरच गौरीच्या आगमनाची तयारी केली जाते. या पंरपरा पार पाडताना काही महिलांनी गौरी गौरी कुठे आलात असे विचारुन तर काही महिलांनी मी माझ्या माहेरी आली , गौराई कशासाठी आली तर मी माझ्या पोराबाळांसाठी गाई वासरांसाठी आली गौराई कोणाच्या घरी आलीं तर धान्यच्या घरी आली असे म्हणत गौराईंचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आले. सजावटीला प्राधान्य गौरीचे पारंपरिक पद्धतीने आणि सोनपावलांनी आगमन झाल्यानंतर महिलांच्या उत्साहाला उधाण आले.

धार्मिक संस्कृती बरोबरच तेल घाणा असलेला देखावा

गौराई ला साजशृंगार करण्यासाठी महिलांनी विशेष परिश्रम घेतले.आपल्या गौरी छान दिसावी यासाठी जरी पदराच्या साडी बाजुबंद , लक्ष्मीहार , कमर पट्टा , बोरमाळ , तसेच विविध प्रकारचे दागिने घालून गौराई सजवण्यात आली , पारंपारिक पद्धतीने छान दिसावी आकर्षक सजावट व झोपाळ्यावर बसून झोका घेणारी गौरी व संस्कृती व धार्मिक पद्धती चे तेल घाणा आणि विठ्ठलाची मूर्ती व १५ ते २० असे खाद्यपदार्थ सुका फराळ , करंज्या , कापणी नैवेद्य , पोरण पोळी अशा पद्धतीने भिसे कुटुंबातील सर्व महिला सदस्यांनी सजावट केली होती.

गुरूवारी सायंकाळी सर्व महिलांना हळदी कुंकू साठी बोलवण्यात आल्या पाटावर चादर अंथरूण त्यावर तांदळाची रास ठेवून लक्ष्मीच्या रुपाने आलेल्या झाड वेलींचे स्वागत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!