हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

पतीच्या खून प्रकरणी पत्नी , प्रियकरास अटक ; बुरुंगले याचा खुनच पोलिस तपास उघड

(फलटण/प्रतिनिधी) फलटण शहरातील शिवाजीनगर येथील बेपत्ता अजित पोपट बुरुंगले (वय २४) तरुणांचा खून झाल्याचे उघड झाले आहे , या प्रकरणी याची अजित बुरुंगले याची पत्नी त्याचा प्रियकर व अन्य एकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे पोलिसांनी संशयित शिवानी अजित बुरुंगले ( वय 19) तिचा प्रियकर करण विठ्ठल भोसले( रा.थेऊर केसानंद,पुणे )यास अटक केली आहे, तर राहुल उत्तम इंगोले (वय 22 राहणार वाघोली जि. पुणे )हा संशयित अद्याप फार असून पोलीस त्याच्या शोधत असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी फलटण येथील पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील शिवाजीनगर येथील अजित पोपट बुरुंगले रविवारी (ता. 17) रात्री 8च्या सुमारास कोणास काही न सांगता घरातून निघून गेले ची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती, मंगळवार (ता. १९) गणेश चतुर्थी दिवशी सकाळी विडणी तालुका फलटण येथे मीरा उजवा कालव्यामध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत तरुणाचा मृत्यू आढळून आला होता तरुणाचा खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत्यदेह हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता मिसिंग दाखल झालेल्या व सापडल्या मृतदेहाचा व कपड्यांचे वर्णन यामध्ये साधर्म्य आढळल्याने त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला यामध्ये हा मृतदेह अजित बुरुंगले याचा असल्याचे निष्पन्न झाले यानंतर विशेष पथकाने अजित बुरुंगले यांच्या मोबाईल तांत्रिक विश्लेषण व कौशल्याने तपास करून त्याची पत्नी शिवानी चौकशी करून चौकशीत शिवनी चे करण विठ्ठल भोसले यांच्याशी प्रेम संबंध होते ज्या प्रेम संबंधांमध्ये व लग्न करण्यासाठी अजित याचा अडथळा येत होता त्यामुळे करण भोसले याने त्याचा साथीदार राहुल उत्तम इंगोले याच्या मदतीने अजित बुरुंगले यास फलटण येथे मोबाईलवर फोन करून घरातून बाहेर बोलून घेतले होते, त्याची भेट झाल्यानंतर ना त्याचा दोरीने गळा अवळून त्यानंतर ना त्याचे हातपाय दोरीने बांधून पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने त्याला मीरा उजवा कालव्यामध्ये टाकून देत त्याचा खून केल्याची कबुली करण भोसले यांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित करण भोसले यांच्यासह अजित याची पत्नी शिवानीला अटक केली आहे, अन्य संशयित राहुल इंगोले यालाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील शेळके करीत आहेत असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!