हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

फलटण तहसील कार्यालयात पुण्य श्र्लोक अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा लावल्या बद्दल राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदार यांचे मानले आभार

जावली- अजिंक्य आढाव – राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुका तहसील कार्यालयात गेले असता त्यांच्या असे लक्षात आले की सर्व महापुरुष यांचे फोटो आहेत तरी राजमाता पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो नाही असे लक्षात येताच तात्काळ फलटण तालुका उपाध्यक्ष महादेव कुलाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ निवेदन तयार करून माननीय तहसीलदार साहेब यांना देताच माननिय तहसीलदार यांनी तात्काळ राजमाता पुण्यशलोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो लावून घेतला त्या बद्दल तमाम फलटण तालुका धनगर व राष्ट्रीय समाज पक्ष वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

या वेळी उपस्थित राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुका उपाध्यक्ष महादेव कुलाळ ,फलटण तालुका सरचिटणीस भरत नाना वाघमोडे, युवा व्याखते किर्तनकार ह. भ. प. हरी महाराज गोफणे ,राष्ट्रीय समाज पक्ष तरडगाव जिल्हा परिषद गट प्रमुख नितीन सुळ, सुरवडी पंचायत समिती गण प्रमुख सागर माडकर, मंगेश पिंगळे, रणजित कुलाळ , आशिष खराडे राहुल सुळ आदी मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!