हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

युवकाचा खून करून हातपाय बांधून कॅनॉल मध्ये फेकले ; विडणी येथे सापडला मृतदेह

( जावली/अजिंक्य आढाव)युवकास जीवे मारुन पुरावे नष्ट करण्याचे उद्देशाने हातपाय रस्सी कमरेला बांधून त्याला निरा उजवा कॅनॉल मध्ये टाकून देण्यात आले , सदर युवकाचा मृत्यदेह विडणी ता. फलटण येथे सापडला आहे , अद्याप युवकाची ओळख पटलेली नाही याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार 19/9 2023 रोजी सकाळी 8 वा. 26 मिनिटां पूर्वी मौजे विडणी ता फलटण गावच्या हद्दीत निरा उजवा कॅनॉल वरील गाव फुलाच्या शेजारी लिफ्ट क्रमांक 02 येथे , अंदाजे 25 ते 30 वर्षाचा युवकास जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने त्याचे हातपाय एका जाडसर सेने कमरेला बांधून त्यास नीरा उजव्या कॅनॉल च्य पाण्यामध्ये टाकून खून करण्यात आला आहे अशी माहिती समजते.

मयत युवकाचे वर्णन उंची १६५ सेंटी मीटर , रंग सावळा केस काळे अंगाने सडपातळ मयताच्या अंगात फुलं बाह्याचा निळ्या रंगाचा व त्यावर गडद आणि फिक्कट आडव्या पट्ट्या असलेल्या शर्ट काळया रंगाची फुलं पॅन्ट, जांभळ्या रंगाची अमोल माचो कंपनीची 85 नंबरची अंडर वेअर व पांढऱ्या रंगाचे हाफ बनियन तरी मयत युवक बाबत काही माहिती असेल तर ग्रामीण पोलिस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक सुनील महाडिक मो. 9823562255, फलटण ग्रामीण पोलिस स्टेशन 02166222533

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!