(अजिंक्य आढाव/जावली)महाराष्ट्र राज्य परिवहन च्या आगाराचे व्यवस्थापक वासंती जगदाळे यांची आज बदली करण्यात आली आहे त्यांची कोल्हापूर विभागातील चंदगड आगारात बदली झाले , फलटण आगाराचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही दिवसातच त्यांच्या कामाबद्दल नाराजी निर्माण झाली होती तालुक्यातील गाड्यांची वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते याचा नाहक त्रास तालुक्यातील प्रवासांना सहन करावा लागत होता, गेल्या महिन्याभरापूर्वीच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण आगाराला भेट दिली व नागरिकांच्या समस्या सोडविल्या, परंतु ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या वाढवाव्या पूर्वीप्रमाणे वेळापत्रक करावे फलटण आगारातने आपला कारभार सुधारावा अन्यथा कठोर भूमिका घ्यावी लागली सूचना त्यांनी केली होती. पण याबाबत कोणती सुधारणा न झाल्याने व नागरिकांच्या अडचणी वाढत गेल्याने व त्यातच अष्टविनायक यात्रेतील घोटाळा ताजा असताना काल काही नागरिक खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे तक्रार घेऊन गेल्यानंतर त्यांनी याबाबत वरिष्ठांकडे माहिती देऊन बदलीची सूत्रे हलवल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
श्रीमती जगदाळे यांनी 2023 फेब्रुवारी मध्येच फलटण आगाराचा कार्यभार हाती घेतला होता मात्र केवळ आठ महिन्यातच वासंती जगदाळे यांची फलटण आगारातून कार्यमुक्ती झाली आहे , नुकताच फलटण आगारातील अष्टविनायक दर्शन यात्रेतील तिकिटांचा पैशांचा अपहार उघडकीस आला होता.