(गोखळी/प्रतिनिधी) : सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या बुध्दिबळ स्पर्धेत. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा राजाळे ता.फलटण येथील इ. ७वी मध्ये शिकत असलेली कु. खुशी शेखर शेडगे हीची मुधोजी हाय. व ज्युनि. कॉलेज फलटण येथे झालेल्या तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत बुद्धीबळ या खेळात प्रथम क्रमांक मिळवला तिची जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली.
त्या निमित्त सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. वर्गशिक्षिका सौ. साधना शिपटे मुख्याध्यापिका सौ. अरुणा गावडे सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल मोहिते , ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. स्वाती दोंदे ,उपसरपंच शरद निंबाळकर सर्वसदस्य, गटशिक्षणाधिकारी शाहीन पठाण, मॅडम शिक्षणाविस्तार अधिकारी मठपती सो. केंद्रप्रमुख राजकुमार रणवरे , जिल्हा परिषद सदस्य कांचनमाला निबांळकर मॅडम , माजी सनदी अधिकारी विश्वास भोसले , माजी सरपंच संभाजी निंबाळकर, तसेच सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.