हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

शेतकर्यांच्या मातीवर डंल्ला मारणार्या वीटभट्टीवरील मातीचा पंचनामा प्रांताधिकारी मॅडम कधी शेतकर्यांचा सवाल

(एल के सरतापे / म्हसवड) : – देवापुर्, पळसावडे, हिंगणी व ढोकमोड या चार गावच्या हद्दीत असलेल्या राजेवाडी तलावामधून शासनाच्या गाळ मुक्त धरण गाळ युक्त शेती या अभियानाच्या माध्यमातून शेतकर्यांची कोरड वाहु व खडकाळ शेतात शासनाच्या पैशाने तलावातील गाळ मातीने क्षेत्र बागायत करून शेतकरी समृद्ध करण्यासाठी गाळ शेतकर्यांच्या शेतात माती टाकण्यासाठी वापरलेली वाहने, मशनरी यांचा येणारा खर्च शासनाने गाळ माती उचलून शेतात टाकण्याचा ठेका एका सामाजिक संघटनेला दिला होता मात्र या संघटनेने गाळ मुक्त धरण गाळ युक्त शेती या महाराष्ट्र शासनाच्या अभियानाला कात्रजचा घाट दाखवून शेतीच्या नावावर माण तालुक्यातील विट भट्टी कारखान्यावर माती टाकली याचा प्रांताधिकारी मॅडम यांनी पंचनामा करण्याचा दिलेल्या आदेशाचे काय प्रांताधिकारी मॅडम यांचा आदेश म्हणजे बोलाचा भात बोलाची कडी का अशी चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.

राजेवाडी तलावामधून रोज लाखो ब्रास गाळ माती शेतकर्यांची शेती भरण्यासाठी असताना माती उचलण्याचा ठेका एका सामाजिक संघटनेला एनर्जी ओला महाराष्ट्र शासनाने दिला असताना हि शासनाच्या नियमाला कात्रजचा घाट दाखवून सामाजिक संस्थेने शासनाची फसवणूक करुन शेतकरी बांधवाच्या शेतात माती मशनरीने वाहनांत भरून शेतात गाळ टाकण्याऐवजी विट भट्टी कारखान्यावर कोणाच्या सांगण्यावरुन सिसिटिव्ही असताना, संस्थेचे पदाधिकारी, पोलिस, जलसंपदा विभागाचे इंजिनिअर असताना हि सर्वांना चुना लावू गाळयुक्त मातीची वाहतूक करणारी वाहने शेतकर्यांच्या नावावर तलावातील गाळ माती उचलून शेतकर्यांच्या शेतात न टाकता चक्क विट भट्टी कारखान्यावर माती टाकली जात आहे हे प्रांताधिकारी यांना दिड महिन्यापासून सांगून हि उडवा उडवीत उत्तरे देवून माती विट भट्टी कारखान्यावर टाकल्याचे पुरावे द्या त्या क्षणाला कारवाई करते असे म्हणणार्या महसुल विभागाला हा तलावातील गाळ माती विट भट्टी वर मातीने भरलेला डंपर खाली करत असतानाच हा व्हिडिओ, व फोटो महसूल विभागाला देण्यात आल्याने आत्ता महसूल विभाग कारवाई काय करणार याकडे शेतकरी बांधवाचे लक्ष लागले असून गेल्या दिड महिन्या पासून विट भट्टी ला माती ओढली होती त्याचे तलाठ्या मार्फत सर्वे करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे प्रांताधिकारी म्हणाल्या होत्या मात्र कारवाई शून्य मॅडमचा शब्द म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कडी असा तर नाही ना असा सवाल शेतकरी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!