हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

मोबाईल डोक्यावर बसल्याने तरुणाईला आवर घालणे गरजेचे , एका पोष्टने तुमचे करियर संपणार नाही याची काळजी घ्या तहसीलदार विकास अहिरे

(म्हसवड /प्रतिनिधी ) आजच्या या धकाधकीच्या जमान्यात मोबाईल जरी गरजेचा बनला असला तरी तो मोबाईल आज खिशात पाहिजे होता तोच मोबाईल आज आपल्या डोक्यावर बसल्याने त्याचा अतिवापर होत आहे आपन काय पोष्ट करतोय याचे भान राहिले नाही पोष्ट टाकताना वाचण्या आधीच टाकू नका त्याची तपासणी केल्याशिवाय पुढे पाठवु नका , तुमच्या एका पोष्टने धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या दंगलीच्या जमावा मध्ये आपल्याला कोण पोलीस शोधणार नाही असे कोणी समजून नये सायबर टिमला तुमच्या पर्यंत पोचण्यास वेळ लागत नाही तुम्ही विनाकारण आडकत जाल विशेषता विद्यार्थानी काळजी घ्या तुमचे करियर तर अडचणीत येणार नाही ना, येणारा गणेशोत्सव व ईद हे दोन्ही सण गुण्या गोविंदाने साजरा करताना वाद टाळा घटना घडूच नये यासाठी प्रयत्न करा घटना घडल्यावर जो पश्चात होणार आहे तो खूप महागात पडते तालुक्याचे कुटुंब प्रमुख म्हणून मी तुमच्या समोर आहे असे माणचे तहसीलदार विकास अहिरे यांनी म्हसवड येथे शांतता बैठकीत आवाहन केले

गेल्या आठवड्यात एका पोस्ट मुळे माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडल्याने दोन गटात.जातिय तेढ निर्माण झाली होती.या पार्श्वभूमीवर म्हसवड पोलीस स्टेशन व माण तहसीलदार कार्यालयाच्या वतीने जातीय सलोखा व शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती.

या बैठकीला माण तालुक्याचे तहसीलदार विकास अहिरे , सपोनि राजकुमार भुजबळ माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी, माजी नगरसेवकअखिल काझी, माजी नगराध्यक्ष शहाजी लोखंडे, माजी नगराध्यक्ष डॉ. वसंत मासाळ,जय राजमाने , किशोर सोनवणे, करण पोरे, अॅड.निसार काझी , रामचंद्र नरळे, सयाजी लोखंडे, ए के नामदास , आरिफ मुजावर, शौकत मुल्ला, अमिर तांबोळी, इर्शाद काझी, असद मुल्ला, आशिफ मुजावर, फारुख काझी, माजी नगरसेवक कुमार सरतापे, अंगुली बनसोडे सुरेश म्हेत्रे, दाऊद मुल्ला, महेश लोखंडे, सचिन माने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी किशोर सोनवणे म्हणाले मजिद मध्ये व गावात जे बाहेरचे लोक येवून स्थानिकांची माथी भडकवतात त्यांना प्रथम पोलिसांनी शोधून शहरा बाहे काढावे बाहेरचा आलेला तो व्यक्ती आमच्या मुलांना काय शिकवतो हे पहाण्यासाठी मंदिर मजिद मध्ये म्हसवडच्या नागरीकांनी जाऊन वेळच्या वेळी पाहिले तर हि वेळ येणार नाही असे सोनवणे म्हणाले
यावेळी शौकत मुल्ला म्हणाले म्हसवडच्या नागरीकांनी आवश्य मजिद येवून बाहेरचा व्यक्ती आमच्या मुलांना काय शिकवतो हे पहायला यावे आमच्या मजिदचे दरवाजे तुमच्यासाठी सतत उघडे आहेत म्हसवडचे लोक मजिद मध्ये येत नाहीत त्यामुळे गैरसमज होतो असे मुल्ला म्हणाले
युवराज सुर्यवंशी म्हणाले या दंगली मध्ये शालेय काॅलेज मधील युवक जास्त आहे त्यामुळे माण तालुक्यातील शाळा काॅलेज मध्ये मुलांना मार्गदर्शन व्हावे असे सुर्यवंशी म्हणाले.

सयाजी लोखंडे म्हणाले लोकशाही मध्ये कोणत्याही धर्माला दोष देता येत नाहीत माणुसकी हाच खरा धर्म आहे आणि माणसाने माणसासाठी वागावे एवढीच सर्वांकडून अपेक्षा आहे असे लोखंडे म्हणाले
यावेळी सपोनि राजकुमार भुजबळ म्हणाले म्हसवड परिसरातील नागरिकांनी जातीय सलोखा व शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे कोणत्याही प्रकारची सोशल मीडियावर चुकीची पोस्ट करू नये. अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे सांगून सपने भुजबळ म्हणाले की कसलेही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये,पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे कोणतेही प्रकारचे माहिती मिळताच त्वरित म्हसवड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा असे आवाहन भुजबळ यांनी केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष नितीन जोशी म्हणाले सध्याचे वातावरण गढूळ आहे सर्वांनी विशेषता एडमिन यांनी जबाबदारी वागले पाहिजे ग्रुप मधील कोण गैर पोष्ट करत असेल तर पोलीस यांना कळवावे हे आलेले मानव निर्मित संकट दूर करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन दोशी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!