(अजिंक्य आढाव/ जावली) – आई प्रतिष्ठान वाठार निं. यांच्या मार्फत दिला जाणारा 2022-23आदर्श शिक्षक पुरस्कार मिरढे शाळेतील उपक्रमशील व विद्यार्थिप्रिय शिक्षक श्री. सागर लोंढे सर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. लोंढे सरांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य हे उल्लेखनीय असल्याकारणाने त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर,मा. जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट,मा.पं. स.सदस्य सचिन रणवरे, सातारा जिल्हा शिक्षक सह. बँकेचे चेअरमन मा. राजेंद्र बोराटे, आई प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष गणेश तांबे सर्व पुरस्कार्थी व लोंढे परिवार. लोंढे सरांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामस्थ मिरढे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.