हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

सातारा जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्रीमंत रामराजे यांनी केले जंगी स्वागत

(अजिंक्य आढाव/जावली)- मध्यंतरी राज्याच्या राजकारणात खूप मोठ्या हालचाली झाल्या यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडून खा. शरदचंद्रजी पवार व अजित पवार यांच्यात राष्ट्रवादी पक्ष विभागला गेला त्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट राज्याच्या सत्तेमध्ये सहभागी झाला व अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा नव्याने शपथ घेतली यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यामध्ये आज आले. यावेळी सातारा जिल्ह्याच्या सीमेवर शिरवळ येथे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जंगी स्वागत केले.

यावेळी वाईचे आमदार मकरंद पाटील, फलटण कोरेगावचे आमदार दिपक चव्हाण, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मिलिंद नेवसे, फलटण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष संजय पालकर, फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, महानंदा दूध संघाचे संचालक डी. के. अण्णा पवार, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, ॲड. ऋषिकेश काशिद, गोकुळीचे सरपंच बापूराव गावडे इत्यादी मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.

आज सायंकाळी कोल्हापूर येथील तपोवन मैदानावर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची जंगी सभा होणार असून या सभेसाठी जात असताना अजित पवार यांचे सातारा जिल्ह्यामध्ये ठीक ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!