हि बातमी ईतर भाषेत वाचा
राजकीय

परिवर्तनच्या हाती सत्ता देवून म्हसवडच्या जनतेचा भ्रमनिरास केला , १२ दिवसांनी पाणी, म्हसवडचा विकास कोसो दूर गेलेला एका वर्षात नंदनवन करणारा विकास करणार – आ जयकुमार गोरे

८० कोटीची सुधारीत नळ पाणीपुरवठा योजना एका वर्षात पूर्ण करुन म्हसवडच्या महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवणार, २२ कोटी रुपयांची विविध वाडी वस्तीला जोडणारे रस्त्याची कामे सुरू करणार
आगामी काळात ५० कोटीची विकास कामे प्रस्तावित आहेत ते हि लवकर मंजूर करुन कामे मार्गी लावणार
” राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतळा, महात्मा फुले सावित्रीबाई फुले पुतळा सुशोभीकरण, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा व सुसज्ज देखणे सभागृह
महात्मा गांधीं ,यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ” , गार्डन सुशोभीकरण आदी कामे करुन म्हसवड शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे पत्रकार परिषदेत आ गोरे यांनी माहिती दिली

(म्हसवड/ प्रतिनिधी) मागील निवडणुकीत ज्या विश्वासाने म्हसवडच्या लोकांनी परिवर्तनच्या हातात सत्ता दिली त्यानंतर मी व माझ्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कामाकाजा कडे लक्ष दिले नाही मला अनेकवेळा लक्ष घालण्या संबधी निरोप आले पण जनतेने त्यांना कौल दिला होता शहराच्या विकासकामे करण्याचा मात्र या परिवर्तनने शहर भकास केले म्हसवड विकास पासून कोसो दुर नेमले ज्या अवस्थेत म्हसवड होते तसे म्हसवड आज सत्ताधारी गटाने केले पाच वर्षी कमिशन साठी भांडले सहा वर्षात मी लक्ष घातले नाही ज्यांनी लक्ष घातले त्यांनी तहसीलदारा पासून आयुक्ता पर्यंत पदे भोगली साहेब म्हणून पदवी मिरवता त्या साहेबांनी पालिकेची जबाबदारी घेऊन पाच पैशाचा तरी निधी विकास कामासाठी आणायचा, म्हसवडचं वाटोळ केलं, दहा बारा दिवसानी पाणी पुरवठा, रस्ते भकास, गार्डन मध्ये डुकरे, कुत्री फिरतात हेच का साहेबाच्या परिवर्तनचा विकास पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाल्या पासून म्हसवडच्या महिलांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी २४ तास पाणी पुरवठा होणारी ८० कोटींची पाणी योजना एका वर्षात पूर्ण करणार त्याच प्रमाणे म्हसवड व परिसरातील वाड्यावस्त्याला जोडणारे २२ कोटीच्या रस्त्याचे उद्घाटन महसूल मंत्री राधाकृष्णन विखे पाटील यांचे हस्ते होणार असल्याची माहिती आ जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगीतली

म्हसवड पत्रकार परिषदेमध्ये बोलताना माण -खटाव चे आ. जयकुमार गोरे

म्हसवड येथे माजी नगराध्यक्ष विजय धट यांच्या निवासस्थानी उद्या होणाऱ्या विविध विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमाची माहिती सांगण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेला भाजपचे तालुका अध्यक्ष शिवाजी शिंदे, मार्केट कमिटीचे चेअरमन विलासराव देशमुख, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, विजय धट , अकिल काझी,बी एम आबदागिरे, दिपक बनगर , सुरेश म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना पुढे आ गोरे म्हणाले सध्या लोधावड्याचा गडी काय करतोय हे त्याचे त्यालाच कळेना झाले आहे कनफुज झालेला गडी कधी भाजपाच्या नेत्या पंकजाताईचे स्वागत करण्यास सर्वात पुढे जातो तर कधी रासपाचे नेते जानकरसाहेब यांचे बरोबर बसतो तर कधी काँग्रेसच्या बरोबर उद्या आरपीआय बरोबर सुध्दा बसायला तयारी करेल गडी कारण राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडल्याने त्यांच्या सोबत कोणच उरले नाही खटाव मधील १४ नेते तर माण मधील ८ नेते उपमुख्यमंत्री अजितदादाराकडे गेल्याने कनफुज झालेले आपन काय करतोय कशाची कशासाठी आंदोलन करतोय हेच कळेना झाले आहे उरमोडीच्या पाण्याचे आवर्तन सुरु करण्याची मागणी करणारेच पळशीकडे जाणारे पाणी अडवून फोडा फोडी करत आहे अन् हेच कांगावा करीत आहे. ज्या आवर्तनाच्या पाण्यावर यांचा ऊस पिकतोय त्या पाण्यासाठी त्यांनी आधी किती रुपये मोजले आहेत ते एकदा जनतेला सांगावे, पाण्यासाठी जनतेची दिशाभुल करून फक्त स्वता:वर लक्ष केंद्रीत करायचे हे यांचे धंदे आहेत.

ज्या माती प्रकणावरून राष्ट्रवादीच्या या नेत्याने गदारोळ घातला त्यांनी आधी अनाधिकृत माती उपसा कोण करतंय याची माहिती घ्यावी. अनाधिकृत माती, वाळू उपसा करणारे बगलबच्चे कोणाचे आहेत हे सर्व जनतेला चांगलेच माहित आहेत वाहने सोडण्यासाठी कोणाचे फोन पोलीस,महसूल विभागाला येतात त्यांनी जनतेची दिशाभुल थांबवावी तर सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळुन त्यांचा विश्वास संपादित करावा. राजकारण करीत असताना सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदु मानुन कामे करावी लागते, जाती भेद करून राजकारण करता येत नाही, देशमुख यांनी जाती जाती भेदभाव निर्माण करण्याचे काम सुरु केले आहे त्यामुळे सामान्य जनता त्यांच्यापासुन दुरावली असल्याचा आरोप ही यावेळी आ. गोरे यांनी केला.

फलटणचे राजे स्वताला म्हणणारे रामराजे यांनी किती हि आदळ , आपट केली तरी आज पर्यंत त्यांचा कायचं उपयोग झाला नाही रामराजे कधी हि माझ्या विरोधातील लढाईत विजयी होणार नाहीत ते ईरी गेलेले म्हणजे बिना कामाचे नेते झाले आहेत त्यामुळे मी त्यांना महत्त्व देत नाही असे आ जयकुमार गोरे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!