हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

स्वराज्याच्या पुकार केलेलं व रयतेचे राजे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक होते -विश्वजीतराजे निंबाळकर

(प्रतिनिधी/सासकल): जगभरामध्ये अनेक क्रांत्या व अनेक लढे उभारले गेले. त्यामध्ये आपल्या देशात आद्य क्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांनी दिलेला लढा हा गणला जात असून तेच आपला आदर्श असला पाहिजे असे मत फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सासकल या ठिकाणी जयंती महोत्सवात बोलताना सांगितले.

ते म्हणाले,भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्‍यात आली नाही. परंतु त्यांनी प्राणपणाने स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर म्हणजे आद्यक्रांतिकारक नरवीर ‘उमाजी नाईक’. तेव्हा आपण तोच लढा,संघर्ष, विचार डोक्यामध्ये ठेवून आपलं योगदान द्यावे.

यावेळी नरवीर राजे उमाजी नाईक जयंती महोत्सव समितीचे व तरुण मंडळाचे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी कमलाकर आडके विनायक मदने,महेश मदने, दौलत मदने उमाजी आडके, शंकर आडके, नवनाथ मदने, नवनाथ खोमणे, सचिन खोमणे,मंगेश मदने, गणेश मदने सर, सोमनाथ मदने, महादेव आडके, बाबू आडके, गणेश मदने, अंकुश मदने, हनुमंत मदने, अजित आडके, किरण आडके, बाळू आडके, किशोर आडके, रमेश आडके, अर्जन आडके, दादा मदने, गणेश भंडलकर, अमोल मदने, सचिन मदने. अमोल मदने (गांधी),शंकर आडके, बंटी आडके, पोपट मदने, शिवा मदने,प्रमोद आडके,ओंकार आडके,संदीप मदने, अशोक चव्हाण, रोहन मदने, अनिल मदने, दत्ता मदने, दिपक मदने, राजू आडके वाल्मिक मदने,भास्कर मदने, सागर मदने. माता भगिनी,वंदना आडके, बबई आडके,सुरेखा मदने,अनिता मदने, शितल मदने,राजेंद्र घोरपडे, मोहन मुळीक, विकास मुळीक, लक्ष्मण मुळीक, रघुनाथ मुळीक, हणमंतराव मुळीक, धनाजी मुळीक सर, लहू सांवत, अजित मुळीक(पाटील), निखिल चांगण ग्रामस्थ,आबाल वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!