गोखळी (प्रतिनिधी):दिनांक ७ सप्टेंबर गेली २८ वर्षे जेजुरी,सासवड,पुणे याठिकाणी दहीहंडी फोडण्याची परंपरा असलेले आण्णाभाऊ साठे तरुण मंडळ दहीहंडी संघ साठे नगर कसबा बारामती येथील संघाने अखिल पुण्याई नगर दहीहंडी उत्सव समिती धनकवडी (केके मार्केट) पुणे व गणराज गृप धनकवडी पुणे येथील दहीहंडी फोडल्या सदरील दहीहंडी संघ माजी उपनगराध्यक्ष विजयराव खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे या ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी जात असतो सदरील दहीहंडी संघाच्या यशासाठी आण्णाभाऊ साठे तरुण मंडळ दहीहंडी संघाचे सर्व गोविंदा पथकातील सर्व गोविदांनी विशेष परिश्रम घेतले.