गोखळी (प्रतिनिधी): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील खटकेवस्ती/ गोखळी गावचे सुपुत्र प्रणव पोमणे याची नुकतीच जागतिक काॅर्फबाॅल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रणव पोमणे प्राथमिक शिक्षण खटकेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण गोखळी येथील हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात झाले उच्च माध्यमिक शिक्षण बारामती च्या टीसी महाविद्यालयात अकरावी पासून तो शिक्षण घेत आहे.सध्या तो एम काॅम मध्ये शिकत आहे.त्याला काॅर्फबाॅल मध्ये आवड होती या खेळात त्याने कौशल्य दाखवले त्याच्या खेळातील कौशल्यामुळे तर.याची जागतिक काॅर्फबाॅल स्पर्धेसाठी भारतीय संघात नुकतीच निवड झाली. २० ते २९ ऑक्टोबर २०२३ दरम्यान तैवान मधील तैपेई येथे ही स्पर्धा होणार आहे.या स्पर्धेसाठी भारतीय संघाने स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबीर लव्हली पण प्रोफेशनल युनिव्हर्सिटी फगवार येथे १३ ते २४ सप्टेंबर दरम्यान होत असुन प्रणव या शिबीरास उपस्थित राहणार आहे.
प्रणव याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दुसऱ्यांदा स्थान पटकावले आहे, प्रणव पोमणे यांस जिमखाना विभागाचे प्रमुख व शारीरिक शिक्षण संचालक डॉ गौतम जाधव व अशोक देवकर यांचे मार्गदर्शन लाभले .यावेळी खटकेवस्ती चे सरपंच बापूराव गावडे, गवळीबुवा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अक्षयकुमार गावडे,व्हाईस चेअरमन रघुनाथ ढोबळे, उपसरपंच योगेश गावडे पाटील, रामभाऊ पाटोळे उपस्थित होते.