(अजिंक्य आढाव/ जावली) जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना सन 2022/23 या वर्षीत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
श्रीराम खोलेश्वर विद्यालय मुंजवडी येथील शिक्षक प्रविण जगन्नाथ निंबाळकर यांना जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सह्याद्री भैया कदम माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर गटशिक्षणाधिकारी शाहीण पठाण विस्तार अधिकारी साईनाथ वाळेकर साहेब यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला यापूर्वी अध्यापक विद्यालय गिरवी येथे दहा वर्ष सेवा श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल गिरवी येथे ४वर्ष सेवा आणि २०२० पासून मुंजवडी येथे कार्यरत आहेत. निवड श्रेणी वरीष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षक नवनियुकत शिक्षक यांना प्रशिक्षण देण्याचे काम दहा वर्ष तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम शाळेचा निकाल १००% सलग दोन वर्ष शैक्षणिक, सामाजिक श्रेञात पंचक्रोशीत नावाचा उल्लेख आहे.
प्रविण निंबाळकर यांचे एम.ए .एम. एड मराठी हिंदी इतिहास विषयात एम.ए .पूर्ण करत मुंजवडी या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
पुरस्कार मिळाल्याबद्दल मुजंवडी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब चोरमाले सर व शाळेतील शिक्षकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.