हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

चव्हाणपाटी ओढ्याच्या पुलावरील बोगदा दुरुस्त करण्याची मागणी

गोखळी (प्रतिनिधी) फलटण – आसू मार्गावर खटकेवस्ती – साठेफाटा दरम्यान असलेल्या चव्हाणपाटी ओढ्याच्या फरशीवर बोगदा पडल्याने अपघात होण्याची शक्यता आहे त्वरित बोगदा दुरुस्त करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे . फलटण पूर्व भागातील दहा ते पंधरा महत्त्वाच्या गावांना जोडणारा हा एकमेव मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते .

या ओढ्यावयरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे संबंधित खात्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यात आसपास थोडातरी पाऊस झाला तरी ओढ्याच्या पुलावरुन पाणी वाहून जाते पाण्यात खड्डाचा वाहन चालकांना अंदाज न आल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.या ओढ्यात अनेक वेळा खड्डे पडले तात्पुरती मलमपट्टी करून मार्ग काढण्यात येतो रात्री अपरात्री वाहनचालकांचा अपघात होण्याची शक्यता आहे तरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी ओढ्यावयरील पुलाची उंची वाढवण्याची गरज आहे तात्पुरती मलमपट्टी ऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!