(जावली/ अजिंक्य आढाव)फलटण पूर्व भागातील आदंरुड ग्रामपंचायत कार्यालयात आज 232 व्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करीत, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे , इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे, सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे, स्वातंत्र लढ्यातील सशस्त्र क्रांतीचे प्रथम जनक, महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक – नरवीर म्हणजेच राजे उमाजी नाईक असा इतिहास सांगण्यात आला
या वेळी आंदरूड गावाचे सरपंच संपत भिकू कर्णे , उपसरपंच भागवतराव शामराव पाटील ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष, रामभाऊ मसुगडे , संदीप आढाव , बापूराव मसुगडे लालासाहेब मसुगडे सतीश मसुगडे , ज्योतीराम कर्णे ,संजय मसुगडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.