हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांचे जावली ता.फलटण येथे रासप सातारा यांच्या वतीने पाच हजार रुपयांच्या नोटांचा हार घालून सत्कार

(जावली/ अजिंक्य आढाव)राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब यांच्या भगिनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रा जावली तालुका फलटण येथे आली असता राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पाच हजार रुपयांच्या नोटांचा हार घालून सत्कार करण्यात आला.

महादेव जानकर साहेब यांचे राष्ट्रीय समाज पक्षाचे सुरूवात जावली गावातुन झाली होती अशी माहिती पंकजाताई मुंडे यांना या वेळी सांगण्यात आली.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पाच हजार रुपये नोटांचा हार घालण्यात आला , यावेळी जिल्हा अध्यक्ष खंडेराव सरक, निलेश लांडगे अशोक गोफणे , बाळासो चवरे ,विकास शिंदे मोहन गोफणे, पोपट गावडे, विलास चवरे , सागर पोकळे , अक्षय गोफणे , राजाराम कांरूडे, मारूती गोफणे, संदिप नाळे ,दिनेश शेवते ,श्रेयस गोफणे उद्धव गोफणे, हसन आतार आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!