(अजिंक्य आढाव/ जावली) शिवशक्ती परिक्रमेच्या निमित्त भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजाताई मुंडे राज्यातील विविध मंदिरांच्या देव दर्शनाला जात असुन उद्या बुधवार दि.6/9/2023 रोजी महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यांच्या दर्शनासाठी येणार आहेत .
त्या निमित्ताने फलटण येथे सकाळी 11वा फलटण येथील नाना पाटील चौकात आगमन होणार असून फलटण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे ,या बाबत जय कुमार शिंदे, बजरंग गावडे, अमोल सस्ते , सौ उषा राऊत यांनी माहिती दिली आहे