(म्हसवडप्रतिनिधी) जन्मभूमीतील नागरीकांवर , बंधूवर कोणी कोणाच्या सांगण्यावरुन शेतकर्यावर गुन्हे दाखल करत असेल तर मी देशात कुठेही असलो तरी माझ्या गावावर, तालुक्यावर अन्याय प्रशासन असो वा अधिकारी असो त्याला सुट्टी नाही या अन्यायाच्या लढाईत मी कायम मायभूमी बरोबरच असेल असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर म्हणाले पळसावडे, हिंगणी , ढोकमोड व देवापूर येथील नागरिकांशी गेले दिड महिन्यापासून या चार हि गावातील गाळ माती शेतकर्यांना न देता विटभट्टीला दिली जात असल्याने माती उचलण्यावरुन टोकाचे वाद सुरू आहेत या संदर्भात चार हि गावातील नागरिकांशी संवाद करण्यासाठी देवापुर् विकास सेवा सोसायटी आॅफिस मध्ये बैठक आयोजित केली होती या बैठकीचे प्रमुख पाहुणे माण खटावचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख, किसान काँगेस चे उपाध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर ,सरपंच शहाजी बाबर, रासपचे जिल्हा सचिव अॅड. विलास चव्हाण, माण राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते शिवाजीराव यादव, कुंडलिक यादव, सुनील बाबर,बाळासाहेब डोंगरे,रमेश यादव, दादा डोंबाळे, भोजराज यादव, रामभाऊ हुंबे, प्रकाश माने, आबा हूंबे , विठ्ठल चौधरी , जगन्नाथ माने, ज्ञानदेव बाबर, अरुण सावंत, तानाजी पवार, मधुकर कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महादेव जानकर पुढे म्हणाले की गेले महिनाभर राजेवाडी तलावातील माती उपशावरून रणकंदन सुरू आहे. वास्तविक “गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार” हे धोरण आमच्या काळात आणले होते .माळाचा मळा करण्यासाठी माती टाकण्याचे शेतकरी बांधवाला लाखो रुपये देवून ही योजना राबली व ती यशस्वी होताना माळावर फिरताना दिसत आहे मात्र अलीकडच्या काळात त्याचा दुरुपयोग होऊ लागला आहे. राजेवाडी तलावातील मातीही शेतकऱ्यांच्या रानात न जाता वीटभट्टीला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या .इथल्या जमिनी ह्या तलाव क्षेत्रात गेल्यामुळे जगण्यासाठी साधन म्हणून सामुदायिक शेती सोसायटीच्या माध्यमातून इथल्या नागरिकांना तलाव क्षेत्रातील जमिनी टिकवण्यासाठी दिलेले आहेत. मात्र रितसर परवानगी न घेता हद्दीतील माती उपसा होत आहे ही बाब निंदनीय आहे पद्मभूषण डॉ .कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सोसायटी निर्माण करून लोकांच्या उपजीविकेचे साधन निर्माण केले. इथल्या नागरिकांनी एक कमिटी नेमावी . इथल्या तलाव क्षेत्रातील जमिनी टिकल्या पाहिजेत म्हणून मुख्यमंत्र्यांच्या व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन इथले प्रश्न मार्गी लावण्यात येतील. स्थानिकांनीही कोणावर टीका टिप्पणी न करता सर्व गावांनी एक दिलाने रहावे . महसूल विभागाने शेतकऱ्यांवरील अन्यायकारक गुन्हे त तात्काळ मागे घ्यावेत अन्यथा गाठ माझ्याशी आहे असे वक्तव्य केले .युवकांनी आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेऊ नये असे ते म्हणाले.
प्रभाकर देशमुख म्हणाले की राजेवाडी तलाव येथील ज्या लोकांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना पहिले माती उपशासाठी प्राधान्य द्यायला हवे होते पारदर्शक पद्धतीने गाळ उपसा व्हायला हवा होता मात्र राजेवाडी तलावात शासन नियमानुसार गाळ उपसा झाला नाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला गेला या ठिकाणी विनापरवानगी माती उचलण्यात आली त्याला मात्र पोलिसांनी संरक्षण दिले. हिंगणी येथील भाऊ माने हा शेतकरी अटी व नियमानुसार परवानगी मागत असताना परवानगी न देता त्यावर गुन्हे दाखल केले. विट भट्टीवर माती नेहणाऱ्यांवर तालुका प्रशासन कारवाई करत नाही. त्यांची वाहनेजप्त करून कारवाई करण्याची मागणी देशमुख यांनी केली सध्या माण तालुक्यात झुंडशाही चालू आहे. ही धुंड शाही कोणत्याही परिस्थितीत चालू देणार नाही. जिल्हाधिकारी यांनी पारदर्शकता आणून चुकीचे वागण्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावीत. यावेळी सरपंच शहाजी बाबर , प्रा . विश्वंभर बाबर , मधुकर कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.