हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

अधिका-यांनी दबावाखाली काम करुन शेतकर्यांना नाहक त्रास देण्याचे काम करु नये , मला बाहेर पडू न देणारा जन्माला यायचा आहे, पोकळ धमक्यांना भिक देशमुख घालत नाही- प्रभाकर देशमुख

(म्हसवड /प्रतिनिधी ) गेले महिनाभरापासून देवापुर् पळसावडे , हिंगणी व ढोकमोड परिसरात “गाळ मुक्त तलाव गाळयुक्त शेती” या शासनाच्या योजनेचा राजकीय मंडळीनी एक सेवाभावी संस्थेला हातासी धरुन तलावातील गाळ शेतकरी यांचा शेतात टाकण्या ऐवजी विट भट्टीवर टाकली जाते या बाबत महसूल अधिकारी यांना माहिती व पुरावे देवून हि महसूल विभाग पोलिस यंत्रणेस पुढे करुन शेतकरी बांधवांवरच ३५३ चा गुन्हे दाखल करण्याची भाषा, गाडीत उचलून टाकण्याची भाषा पोलिस यंत्रणेला अशोभनीय असुन महसूल व पोलीस अधिकारी वर्गाणी कोणाच्या तरी दबाव खाली काम करून दहशत निर्माण करु नये मला बाहेर फिरु न देणारा जन्माला यायचा आहे , कोणाच्या धमकीला भिक घालणारा मी नाही मला माहीत आहे कोणाला कसे सगळे करायचे अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले.

पत्रकार परिषदेत बोलताना देशमुख व तेजसिंह राजेमाने , प्रा विश्वंभर बाबर

हिंगणी ता माण येथील शेतकरी भाऊ माने याने तलावातील गाळ माती उत्खनन करून शेतात टाकण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्या सह जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभाग सातारा, फलटण पंढरपूर, सोलापूर आदीकडे तलावातील गाळ माती उचलण्यासाठी रितसर अर्ज करून वेळोवेळी पाठपुरावा केला होता; परंतु गाळ माती उपसा करण्यास परवानगी राजकीय दबावापोटी परवानगी दिली नसल्याने माने यांनी त्यांच्या शेतात तलावातील माती टाकत असताना सर्कल व तलाठी यांनी माझी वाहनावर कारवाई केली मी त्यांना सांगत होतो माझ्याकडे परवानगी बाबत अर्ज केल्याची कागदपत्रे आहेत ती बघा मगच कारवाई करा असे सांगून हि पोलिसांना बोलवून माझी वाहणे म्हसवड पोलीस ठाण्यात नेहल्यानेच मी प्रशासनाच्या निषेधार्थ औषध पिऊन जिव देण्याचा प्रयत्न केला मी एक शेतकरी आहे आणी मलाच शेतीला माती मिळत नाही मात्र दुसरीकडे विटभट्टीला रॅयलटी न भरता माती माती दिली जात आहे हाच का प्रशासनाचा न्याय शेतकरी मारायचा व विटभट्टीवाले जगवायचे यामुळे मी औषध घेतले असे भाऊ माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भाऊ माने विषारी औषध पिल्याने म्हसवड येथील लाईफलाईन या आयसीयु हाॅस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत त्याची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख आले होते त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत महसूल, पोलीस व आ गोरे यांचेवर सडकून टिका करत शेलक्या शब्द समाचार घेताना म्हणाले गेले महिनाभर ज्यांनी ज्यांनी माती विटभट्टीला टाकली त्या डंपर, पोकलेन, जेसीबी यांची फोटो व व्हीडिओ तहसीलदार व प्रांताधिकारी मॅडम यांना दिले असून त्या मालकावर गुन्हे दाखल करावे या बाबत माझी चर्चा झाली असून प्रशासन कोणाच्या दाबाखाली कारवाई करण्यास भित आहे विट भट्टी साठी माती उपसा करणारा मोकाटच आहेत. मात्र गरीब शेतकऱ्यांच्या वर अन्याय होत आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी दुजाभाव व करता कारवाई करावी. असे मत राष्ट्रवादी चे नेते प्रभाकर देशमुख यांनी म्हसवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त करून पुढे म्हणाले मला बाहेर फिरु न देणारा आजून जन्मायचा आहे मी कोणाच्या असल्या पोकळ धमक्यांना भिक घालणारा नाही पातळी सोडून बोलणाऱ्याला कसे सरळे करायचे हे मला चांगले माहीत हे लक्षात ठेवावे असा सेलक्या शब्दात समाचार प्रभाकर देशमुख यांनी घेतला.

यावेळी तेजसिह राजेमाने, विलासराव माने, प्रा विश्वंभर बाबर , सुरेश बाबर , कुंडलिक यादव , सचिन लोखंडे , परेश व्होरा , चंद्रकांत केवटे , आदी प्रमुख पदाधिकारी डाॅक्टर, व भाऊ माने यांच्या कुटुंबातील मंडळी उपस्थित होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!