हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

मठाचीवाडी येथील कोंडिबा आबा राऊत यांचे निधन

गोखळी (प्रतिनिधी): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील मठाचीवाडी येथील कोंडीबा आबा राऊत (वय ८७) यांचे अल्पसा आजारपणामुळे निधन झाले. त्यांना भाऊ या नावाने ओळखले जात, मठाचीवाडी ग्रामपंचायतीचे वीस वर्षे सदस्य तसेच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पाच वर्षे म्हणून कामकाज केले . फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शाखा विस्तरात त्यांचा सहभाग होता. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात तन, मन,धनाने सहभागी होत.

शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला होता. त्यांच्या पश्चात पत्नी,एक विवाहित मुलगा,चार विवाहित मुली,एक भाऊ, भावजय , दोन विवाहित पुतणेआणि नातवडे असा परिवार आहे. अंत्यविधी प्रसंगी माण, माळशिरस, इंदापूर, फलटण,बारामती, दौंड आदी भागातील सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक,राजकीय, कृषी क्षेत्रातील आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!