आपला जिल्हा
शेनवडीचा तलाठी लाचलुचपतच्या कचाट्यात , म्हसवड माळशिरस चौकात रंगेहाथ पकडले..
म्हसवडमध्ये सापळा रचून रंगेहात पकडले...
(म्हसवड/ प्रतिनिधी) : न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फेरफारला जमिनीची नोंद रितसर करायची असताना त्यासाठी नऊ हजार रुपयांची मागणी करुन ती नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना माण तालुक्यातील शेनवडी ता माण येथील तलाठी तुकाराम शामराव नरळे (वय ३६, रा. पानवन, ता. माण) यास सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याने महसूल विभागाच्या लाच खोरपणाची चर्चा मात्र माण तालुक्यात जोरदार सुरू आहे.
या बाबत मिळालेली माहिती असी तक्रारदार यांचे चुलत सासऱ्याची शेनवडी ता माण येथील साडे तेरा एकर जमिनी बाबत म्हसवड न्यायालयात दावा सुरू होता. त्याचा निकाल होऊन ही जमीन तक्रारदार यांचे पती व दीर यांच्या नावे करण्याचा आदेश झाला. त्याप्रमाणे फेरफारला नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी तलाठी तुकाराम नरळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या कामासाठी अकरा हजार रुपये लागतील तरच नोंद होईल शेवटी तडजोडी अंती ९ हजार रुपये देण्याचे ठरले.
म्हसवडमध्ये सापळा रचून रंगेहात पकडले
शेनवडी येथील साडे तेरा एकर जमीनीची फेरफारला नोंद करण्यासाठी नऊ हजाराची लाच घेण्यासाठी तलाठ्याने आज शुक्रवारी दुपारी ४ च्या दरम्यान सातारा पंढरपूर रोडवरील माळशिरस चौका नजिक उद्यमनगर (ढोर कारखाना) समोर तक्रारदाराला तलाठी नरळे याने बोलवून त्याच्या कडुन नऊ हजार रूपयेची लाच घेताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य, पोलीस नाईक निलेश चव्हाण, प्रशांत नलावडे मारुती अडागळे, पोलीस शिपाई तुषार भोसले यांनी सहभाग घेतला होता.
लाच मागितल्यास संपर्क साधा