हि बातमी ईतर भाषेत वाचा
महाराष्ट्र

माती उपसा प्रकरणी भाऊ माने यांचेवर गुन्हा दाखल, एक कोटी पाच लाखाची वाहने जप्त, परिश्रम न्यूज चॅनेल मुळे माती उपसा थांबला

अवैध माती वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई

परिश्रम न्यूज चॅनेल च्या बातमीने माती झाली बंद

परिश्रम न्यूज चॅनेलने वारंवार शेतकरी बांधवांची हक्काची माती जबरदस्तीने राजकारणी मंडळी विट व्यावसायिक यांना दिली जात असल्याची बातम्या प्रसिद्ध होऊन प्रांताधिकारी, तहसीलदार, जलसंपदा विभागाचे इंजिनिअर, यांना वेळो वेळी संवाद साधून तलावात होत असलेला गोंधळ व पुरावे वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच आज गुरुवारी माती उपसा बंदचा निर्णय झाल्याने देवापुर्, पळसावडे व हिंगणी परिसरातील शेतकर्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले

(म्हसवड /प्रतिनिधी ) : गेले महिनभर देवापुर्, पळसावडे, हिंगणी तलावातील गाळ माती उपसा वरुन महसूल, पोलीस, विट भट्टी व्यावसायिक व या भागातील नागरीक यांच्या मध्ये रोज टोकाचे वाद पहावयास मिळत असून हि माती शेतकर्याची राणे भरण्यासाठी दिली असताना राजकीय मंडळी मात्र भविष्यातील राजकार करण्यासाठी विट व्यावसायातील मिळालेला पैसे, वाळू चोरीतुन मिळालेला पैसा राजकारणात वापरण्यासाठी अधिकारी वर्गाला हातातील धरुन शेतकर्याची माती विट भट्टीला राज रोस जाते मात्र हिंगणी ता माण येथील भाऊ नामदेव माने वय ४२ यानी हिंगणी ढोकमोड हद्दीतील तलावातील ५० ब्रास मती विनापरवाना उत्खनन केल्या प्रकरणी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या भरारी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकून लाख रुपये किमतीची चार वाहने जप्त करून मानेवर कारवाई केल्याच्या रागाच्या भरात भाऊ माने यांना विषारी औषध घेऊन जिवन संपवण्याचा प्रयत्न केल्यानंतर मोठा राडा होणार या भिती पोटी ४८ तासा नंतर महसूलने बुधवारी रात्री ११ वाजता माती चोरीचा गुन्हा म्हसवड पोलिसात दाखल केला

याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की हिंगणी ता. माण नजीक ढोकमोडा हद्दीतील देवापूर तलावात माती शेतकरी आपल्या शेतात टाकत असल्याचा निनावी फोन प्रशासनास जाताच सोमवारी दिनांक २८ रोजी मध्य रात्री साडेअकराच्या दरम्यान महसूल विभागाच्या गौणखनिज उत्खनन प्रतिबंधक पथकातील वरकुटे- मलवडीचे मंडल अधिकारी जोतीराम बबन दरडे तलाठी जी. एस. म्हेत्रे, जांभुळणीचे तलाठी बी. एस. वाळके यांच्यासोबत पोलिसांचे पथक घटनास्थळी गेल्या नंतर पथकाने पोकलेन तीन डंपरमध्ये माती भरून नेली जात असल्याचे पथकाला आढळून आल्यानंतर त्यांनी सर्व वाहने म्हसवड पोलिसात आणत असताना भरारी पथकास या ठिकाणी उपस्थित असलेल्या दहा जणांनी वाहने जप्त करून नेण्यासाठी अटकाव करून वाहनातील हवा सोडून देवून तेथून पळ काढला.

विनापरवाना गौणखनिज उत्खननप्रकरणी भाऊ माने याच्या विरोधात बुधवारी रात्री आकरा वाजता म्हणजे ४८ तासानी म्हसवड पोलिसात गुन्हा दाखल करून . पोलिसांनी एका पोकलेनसह तीन डंपर असे एकूण एक कोटी पाच लाख रुपये किमतीची वाहने ताब्यात घेतली

शेतकऱ्यांला शेतीसाठी माती उपसास परवानगी देण्यास टाळाटाळ…?

भाऊ माने याने तलावातील गाळाची माती उत्खनन करून शेतात टाकण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्या सह प्रशासनाकडे अर्ज करून वेळोवेळी पाठपुरावा केला होता; परंतु गाळ माती उपसा करण्यास परवानगी दिली गेली नसल्याचा आरोप भाऊ माने यांनी करून विट भट्टीवर मात्र राजरोस तलावातील माती उतरली जात आहे मी रितसर मागणी करुन हि माझ्यावर जप्तीची कारवाई केली म्हणूनच प्रशासनाच्या निषेधार्थ विषारी औषध घेऊन जिवनच संपवायचा निर्णय घेतला.

कारवाई नंतर गुन्हा दाखल करण्यास ४८ तासा मागील गौडबंगाल काय

भाऊ माने हे विनापरवाना गौणखनिज उत्खनन करत असल्याने सोमवारी रात्री साडे अकरा वाजता महसूल विभागाने वाहने पोलिसांच्या मदतीने पोलीस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री आणली मात्र कारवाई वा गुन्हा दाखल करण्यास महसूल विभागाला, तलाठी व सर्कल यांना ४८ तास म्हणजे दोन दिवस दोन रात्र का लागले या मागील गौडबंगाल काय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!