हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

सौ सुवर्णा लोंढे यांचा महिलांनी आदर्श द्यावा – वैभव गीते

(अजिंक्य आढाव/जावली): महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून मिरढे गावच्या सौ. सुवर्णा सागर लोंढे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. कौटुंबिक जबादारी पार पाडत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सातत्यपूर्ण अभ्यास करून त्यांनी यश संपादन केले.त्यांचे प्राथ. व माध्यमिक शिक्षण ढवळ येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण मुधोजी महाविद्यालय फलटण येथे झाली. पदवीचे शिक्षण त्यांनी यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पूर्ण केले.
नॅशनल दलीत मोमेंट फाॅर जस्टिस वैभव गीते यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी संदेश आढाव, मोरे सर उपस्थित होते.
सध्या तरुणाई मोबाईल च्या जमान्यात भरकट चालली आहे माञ सौ. सुवर्णा लोंढे यांनी आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळत पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्या.हा महिलांनी आदर्श द्यावा वैभव गीते म्हणाले.शोषित घटक व विशेषतः महिलांसाठी कार्य करण्याची लहानपणापासून इच्छा असल्यामुळे स्पर्धा परीक्षा करण्याचे ठरवले होते व त्यामुळे लग्नानंतर हि आठ वर्षाची मुलगी असतानाही सातत्य पूर्ण अभ्यास संयम व चिकाटीच्या जोरावर आज हे यश संपादन केले. या यशामध्ये पती श्री.सागर लोंढे व कुटुंबातील सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे यावेळी त्यांनी सांगितले. सर्व ग्रामस्थांमधून कौतुकाचा वर्षाव होत आह

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!