हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

शेतीला माती नेहली म्हणून कारवाई करता मग विटभट्टीला माती उतरली जाते त्यावर कारवाई प्रांताधिकारी कधी करणार..? पुरावा द्या म्हणणार्याना हा घ्या पुरावा…!

(म्हसवड /प्रतिनिधी )देवापुर्, पळसावडे व हिंगणी या तिन गावच्या हद्दीत असलेल्या तलावातून महाराष्ट्र डेव्हलपमेंट या संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांनी या तलावातील गाळ माती हि फक्त आणि फक्त शेतकरी बांधवातील शेती भरण्यासाठी देण्याचा आदेश असताना , सी.सी टिव्ही असताना, या संस्थेचे पदाधिकारी, पोलिस, जलसंपदा विभागाचे इंजिनिअर असताना या सर्वाना चुना लावू गाळयुक्त मातीची वाहतूक करणारी वाहने शेतकर्यांच्या नावावर तलावातील गाळ माती उचलून शेतकर्यांच्या शेतात न टाकता चक्क विट भट्टी कारखान्यावर माती टाकली जात आहे हे प्रांताधिकारी यांना दिड महिन्यापासून सांगून हि उडवा उडवीत उत्तरे कोण त्या राजकारणी नेत्याच्या मनधरणीसाठी महसूल विभागाच्या खेळ सुरू आहे असा सवाल शेतकरी विचारत आहे.?

वीटभट्टीला माती टाकली जाते हा पुरावा दाखवा मी त्या क्षणाला कारवाई करते असे म्हणणार्या महसुल विभागाला हा तलावातील गाळ माती विट भट्टी वर मातीने भरलेला डंपर खाली करत आसतानाचा हा व्हिडिओ, व फोटो महसूल विभागाला देण्यात आल्याने आत्ता महसूल विभाग कारवाई काय करणार याकडे शेतकरी बांधवाचे लक्ष लागले असून गेल्या महिन्यात विट भट्टी ला माती ओढली होती त्याचे तलाठ्या मार्फत सर्वे करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे प्रांताधिकारी म्हणाल्या होत्या त्यानंतर पुन्हा मातीचा ठेवला सुरू झाल्यावर विट भट्टीला माती दिली जात असल्याचा पुरावा द्या कारवाई करते असे दोन वेळा मॅडम म्हणल्या मात्र कारवाई शून्य मॅडमचा शब्द म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कडी असा तर नाही ना असा सवाल उपस्थित होत असून दोन दिवसात मॅडम यांनी कारवाई न केल्यास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाची तयारी सध्या या हिंगणी, पळसावडे व देवापुर् परिसरात सुरू आहे

देवापुर् पळसावडे व हिंगणी परिसरातील भूमिपुत्रांच्या जमिनी तलावातील मध्ये गेल्याने तलावातील गाळ क्षेत्र त्या शेतकरी बांधवाला कसण्यासाठी शेती सोसायटी माध्यमातून दिले असताना इथले शेतकरी अल्प भूधारक असून इथल्या नागरिकांच्या तलाव क्षेत्रात जमिनी गेल्या आहेत. त्यामुळे तलाव क्षेत्रातील जमिनीच इथल्या नागरिकांच्या जगण्याचे साधन असुन कोणत्याही परिस्थितीत इथली शेती सोसायटी अंतर्गत जमिनीतील माती उपसा होउ देणार नाही अशी ठाम भूमिका तिन्ही गावातील नागरिकांनी घेतली असून इथली माती हि शेतीसाठीच फक्त वापरली जात असताना.

अधिकार्यांना हातातील धरुन राजकीय मंडळी गाळयुक्त माती विट भट्टी वाक्याचे चोचले का पुरवत आहे लाखो ब्रास माती विट भट्टी चालक दरवर्षी वापरता वर्षाला महसूल किती देतात हा आत्मचिंतनाचा विषय असून गेले दोन महिन्यापासून तलावात डंपर चालक, पोलीस व अधिकारी यांच्या मध्ये तलावातील परिस्थिती असून कधी भडका होईल हे कोणत्याही सांगू शकत नसले तरी प्रशासन तलावात खून होण्याची वाट पहात आहे का प्रशासन पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या परिसरातील नागरीकांवर गुन्हे दाखल करण्या बाबत दम दिला जात आहे हि माती शेतीसाठी असताना या भागातील शेतकरी यांनी तलावातील माती उचलली म्हणून देवापुर् व हिंगणी या दोन्ही ठिकाणच्या स्थानिक शेतकरी बांधवांवर वाहणे जप्त करून महसूल विभागाने पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून शेतकरी बांधवांवर अन्याय करत असल्याने दोन दिवसांपूर्वी हिंगणीच्या ३२ वर्षी तरुण शेतकर्याने माती आपल्या शेतात नेहली म्हणून पोलिसांच्या मदतीने हिंगणीच्या शेतकर्याची वाहणे जप्त करून पोलीस ठाण्यात आणली मात्र दोन दिवस होऊन हि ना कारवाई ना गुन्हा दाखल झाला नाही मात्र वाहणे महसूल विभागाने नेल्याने मानसिक धक्का बसल्याने त्या बळी राजाने विषारी औषध पिऊन प्रशासनाच्या निषेधार्थ आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला व तो मरणाच्या दारात आहे हे प्रकरण महसूल विभागाच्या व पोलिसांच्या अंगलट येणार या भीतीपोटी महसूल विभागाने रात्री साडे आकरा वाजता म्हसवड पोलीस ठाण्यात माती उपसा केल्या प्रकरणी सर्कल, तलाठी यांनी त्या शेतकरी बांधवांवर गुन्हा दाखल केला तो औषध पिणारा बळीराजा मरणाच्या दारात दवाखान्यात उपचार घेत आहे तर दुसरीकडे त्या शेतकर्यांचे कमी जास्त झाल्यावर हे प्रकरण प्रांताधिकारी यांच्या अंगलट येईल या भितीने तलाठी व सर्कल यांना पुढे करून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री गुन्हा दाखल केला महसूल विभागाने ज्या प्रमाणे शेतकरी बांधवांवर माती उपसा केला म्हणून दोघावर गुन्हे दाखल केले तसे प्रांताधिकारी तहसीलदार तलाठी सर्कल यांना वाळू उपसा दिसत नाही का का वाळू उपसा करण्याचे टेंडर माणच्या महसूल विभगाने वाळू चोरट्यांना दिले आहे गौण खनिज उत्खनन राजरोसपणे सुरू आहे त्यावर कारवाई किती या महिन्यात केल्या का स्थानिक भूमिपुत्र असलेल्या बळीराजा आधीच दुष्काळी परिस्थितीने मेटाकुटीला आला आहे पाणी नाही चारा नाही, शेतात पिके नाही जगायचं कसं असा प्रश्न चिन्ह उभा असताना महसूल विभागाने केलेल्या कारवाई ने आत्महत्ये शिवाय पर्याय नसल्याचे विषारी औषध घेतलेल्या हिंगणीच्या माने यांनी खंत व्यक्त केली असून महसूल विभागाने आधी विट भट्टी ला गेलेल्या मातीवर कारवाई करावी अन्यथा पुढील महिन्यात महसूल विभागाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा अॅड विलास चव्हाण, कुंडलीत यादव, शिवाजी यादव, रावसाहेब बाबर, आदी शेतकरी बांधवाणी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!