हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्रीडा व मनोरंजन

पांच पांडव आश्रम शाळेचे तालुकास्तरीय व्हाॅलिबाॅल स्पर्धेत यश

 गोखळी ( प्रतिनिधी ): तालुका स्तरावरील व्हाॅलिबाॅल स्पर्धेत धुळदेव ता ‌फलटण येथील पाच पांडव आश्रम शाळेने अजिंक्यपद मिळविले. श्रीमंत सगुणामाता माध्यमिक विद्यालय दालवडी ता.फलटण येथे तालुका स्तरीय व्हाॅलिबाॅल स्पर्धा संपन्न झाल्या.

सदर स्पर्धेत पाच पांडव माध्यमिक आश्रमशाळा अलगुडेवाडी या आश्रमशाळेच्या संघाने ताथवडा आश्रमशाळेच्या संघाविरुध्द झालेल्या अंतीम सामन्यात 2-0 असा सरळ सेट मध्ये पराभव करत तालुका अजिंक्यपदाची परंपरा कायम राखली.त्यांची निवड 14 सप्टेंबर रोजी शाहु स्टेडीयम सातारा या ठिकाणी होणा-या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. विजयी संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा महादेव नाळे साहेब नाना तसेच मा.नितिन ऊबाळे साहेब सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सातारा यांनी केले असुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!