हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्रीडा व मनोरंजन

जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त दि. १५ आक्टोंबर २०२३ रोजी डॉ.प्रसाद जोशी यांच्या वतीने फलटण येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

आपलं फलटण,आपली मॅरेथॉन , गेल्या ७ वर्षीपासुन स्पर्धेचे आयोजन

(अजिंक्य आढाव/ जावली)जोशी हॉस्पिटल प्रा ली आयोजित ” आपली फलटण मॅरेथोन २०२३ “जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त दि. १५ आक्टोंबर २०२३ रोजी फलटण येथे मॅरेथॉनचे चे आयोजन केले आहे .जोशी हॉस्पिटल प्रा, लि. आणि ट्रामा सेंटर, फलटण च्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त मॅरेथॉन चे आयोजन रविवार दि. 15 आक्टोंबर रोजी सकाळी 6 वा. सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथे करण्यात येत असल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त जोशी हास्पिटल गेल्या ७ वर्षापासून अनोख्या व आगळ्या वेगळ्या पध्दतीने हा दिन साजरा करत आहे. कोरोना महामारी मुळे मधील दोन वर्षे कुठलेच कार्यक्रम घेता आले नाहीत. त्यामुळे या वर्षी अधिक जोमाने हा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून साजरा करूयात असे डॉ प्रसाद जोशी यांनी आवाहन केले आहे .

मानवी जीवन आनंदी व समाधानी असावे त्यासाठी निरोगी मनाची आणि निरोगी मनाच्या वास्तव्यासाठी निरोगी शरीराची आवश्यकता असते. शरीर निरोगी ठेवण्यात आहार व व्यायाम यांचा मुख्य वाटा असून देशाच्या जडणघडणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे असल्याने युवा पिढीला समजावून घेवून त्यांच्याशी सुसंवाद प्रस्थापित करणे हे सामाजिक कर्तव्य असून जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉन कार्यक्रम हा त्यादृष्टीने खारीचा वाटा असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी स्पष्ट केले.

25 ते 75 वर्षे वयोगटातील सर्वाना व्यायामाचे महत्त्व समजावून देणे व प्रबोधन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.गेल्या २३ वर्षांपासून फलटण येथे कार्यरत असताना अस्थिरोग उपचार, सांधेरोपण शस्त्रक्रिया आणि मणक्यांवरील शस्त्रक्रिया करून अविरत उपचार देणे चालूच आहे .सदरचे पेशंट आमच्या कुटुंबाचा एक भाग असल्याने सर्वांनी एकत्र येवून दि. 15 आक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. प्रसाद जोशी यांनी सार्वांना केले आहे.

दि. 15 आक्टोंबर रोजी सकाळी 6 वाजता सजाई गार्डन फलटण येथून 15 कि.मी. मॅरेथॉनची सुरुवात होणार आहे. सकाळी 6. 30 वाजता सजाई गार्डन येथून 10 कि. मी. मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात होणार आहे. सकाळी 7 वाजता 5 कि. मी. Marathon ची स्पर्धा सुरू होणार आहे.
सकाळी 7.30 वाजता 3 km ची ज्येष्ठांसाठीची वाकेथान सुरू होणार आहे .
सकाळी 8 वाजता Robotic तंत्रज्ञानाची केलेल्या पहिल्या 50 patients ची अनोखी 1.5 km ची चालण्याची परेड आपल्याला पाहायला मिळणार आहे .  Marathon पूर्ण केल्यावर प्रत्येकाला एक finisher 🥇 मेडल मिळणार आहे . त्यानंतर भरपेट नाष्ट्याची सोय केली आहे.

10.30 वाजता मुख्य कार्यक्रमा मध्ये मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप केले जाईल.
सजाई गार्डन कार्यालयामधील कार्यक्रमासाठी प्रवेश पास आवश्यक असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.

मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी दि. 30 सप्टेंबर पर्यंत आनलाईन नोंदणी
joshihospitalpvtltd.com या वेब साईट वर करता येणार आहे .

प्रवेश शुल्क 500/- फक्त आहे जे की ऑनलाईन pay करायचे आहे.
3 km मध्ये भाग घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही फी आकारली जाणार नसल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी सांगितले.
१२,१३ आणि १४ ऑक्टोबर या तीनही तारखेला सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत marathon चे किट घेऊन जावे की ज्यामध्ये T Shirt , Runner BIB , टोपी आणि एक आकर्षक गिफ्ट मिळेल
तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीजास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जोशी हॉस्पिटल प्रा ली, फलटण तर्फे करण्यात आले आहे .
” *तूच आहेस तुझ्या जीवनाचा रचनाकार* !
*घेऊन आपली फलटण मॅराथोन २०२३ मध्ये सक्रिय भाग करूयात आपलेच आरोग्य सदाबहार.!!
१५ october २०२३ रोजी जोशी हॉस्पिटल प्रा ली आयोजित ” आपली – फलटण Marathon 2023 ” मध्ये गट या प्रमाणे:-
१. 18 ते 30 (Male/female) जोश पूर्ण युवा गट
२. 31 ते 45 (Male /Female) सळसळती तरुणाई
३. 46 te 64 (Male /female)प्रगल्भ प्रौढ
४. 65 and Above (Male/female) अनुभवी ज्येष्ठ असे ४ गट करण्यात आले आहेत.

पहिले तीन गट हे ५ km , १० km आणि १५ km च्या marathon मध्ये आपल्या क्षमते नुसार भाग घेऊ शकतात.
चौथा गट हा फक्त ३km Walkethon साठीच आहे .(ह्या गटाला registration fee माफ आहे) .
प्रत्येकाला marathon पूर्ण केल्याचे 🏅 मेडल दिले जाणार आहे . E certificate पण दिले जाईल. प्रत्येक गटात पुरुष / महिला प्रत्येकी पहिल्या येणाऱ्या तिघांना बक्षीस दिले जाणार आहे. तर चला मग वाट कशाची बघताय?
करा पटकन register online खालील वेबसाईट वर
www.joshihospitalpvtltd.com

Registration fee –
₹ 500 /- फक्त .
Last date of रजिस्ट्रेशन
दिनांक ३० सप्टेंबर २०२३

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!