हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

राजाळे येथील अतिक्रमण बाबत तहसीलदार यांची प्रत्यक्ष पाहणी ; शासनाच्या भुमिका कडे ग्रामस्थांचे लक्ष..?

योग्य कारवाई न केल्यास फलटण तहसील कार्यालया समोर उपोषण करणार -निखिल निंबाळकर सामाजिक कार्यकर्ते

(राजाळे/ प्रतिनिधी ) राजाळे दि. २८/०८/२०२३ महाराष्ट्र शासन जागेत अतिक्रम केलेल्या जागेची तहसिलदार यांनी केली पहाणी. राजाळे गावातील गट नंबर ६२६ व ६२७ हे महाराष्ट्र शासनाचे गट असून मुळ भोगवटादार बाळकृष्ण रामचंद्र बनकर यांना १४१ चौ मीटर क्षेत्र शासनाने दिले आहे त्यांच्या कडून विकसन करार करून पुण्यातील संतोष पांडूरंग मेंगे याने घेतले आहे त्या जागेवर त्याने इमारत बांधकाम करताना जानाई मंदिर ते सरडे असा जुना रस्ता बंद करून अंदाजे ३ गुंठे क्षेत्रावर इमारत बांधली आहे. आणि त्या इमारती मधील गाळे गावातील ग्रामपंचायात सदस्य इतर काही लोकांना दस्त करून विकले आहेत.

याबात सामाजिक कार्यकर्ते निखिल निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी सातारा आणि जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार करून मोजणी मागवली होती फलटण भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणी करून अतिक्रमण केलेला जागेचा नकाशा हद्द कायम करून तहसीलदार यांना सर्व नकाशा कागदपत्रे सादर केली होती त्यावर कारवाई म्हणून तहसीलदार यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे हे प्रकरण वर्ग केले होते आज त्या जागेची पाहणी फलटणचे तहसीलदार सर्कल गावचे तलाठी यांनी प्रत्यक्ष येऊन केली गावातील माजी सनदी अधिकाऱ्याच्या दबावाने ग्रामपंचायतीने गाळे मालकांच्या नोंदी ग्रामपंचायत मध्ये केल्या आहेत महाराष्ट्र शासनाची जागा बेकायदेशीर रित्या विकसन करार करून माझी सनदी अधिकार्‍याने पुण्यातील मेंगे यांच्या नावावर हा करार करून त्यांनी रस्ता बंद करून अतिक्रमण केलेले आहे तसेच त्या गाळ्यांचे दस्त केलेले आहेत सर्व गावात या अतिक्रमण केलेल्या इमारतीची चर्चा चालू आहे तहसीलदार यावर काय कारवाई करतात की माजी सनदी अधिकाऱ्याच्या दबावाने प्रकरण दाबले जाते का काय अशी चर्चा सर्वत्र चालू आहे. या प्रकरणावर योग्य ती कारवाई न केल्यास सामाजिक कार्यकर्ते निखिल निंबाळकर यांनी उपोषण करणार असल्याचे तहसीलदार यांना सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!