हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

पानवण येथील ॲट्रासिटी गुन्हयातील सर्व आरोपी अटक चौघांना हि ३१ पर्यंत पोलीस कोठडी

(म्हसवड /प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्र हादरुन सोडणारी माण तालुक्यातील म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील पानवण या गावात माणुसकीला काळीमा फासणारी व पुरोगामी महाराष्ट्र, संताचा महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणून ओळखल्या सातारा जिल्ह्यातील म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मातंग समाजातील महिलेला व तीच्या मुलाला एका दुकानात महिलेला मारहाण करत दुकानातून बाहेर रस्त्यावर फरफटत आणत ऊसाने व लाकडी दांडके व लाथा बुक्यानी मारहाण करुन विनयभंग केल्याच्या घटनेतील चौघांना हि म्हसवड पोलीसांनी अटक करून आज म्हसवड कोर्टात न्यायालयात हजर असता ३१ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळावी या बाबत जिल्हा पोलीस प्रमुख समिर शेख यांना सातारा समता सैनिक दलाचे अरुण पोळ यांनी निवेदन देवून पानवण येथील अत्याचारग्रस्त महिलेस भेटून आम्ही तुमच्या पाठीशी आहे असा निर्णय दिला ,

दिनांक २६ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९ वाजता गांवातील प्रतिष्ठीत व्यक्तीचे समोर महालक्ष्मी खताचे दुकाना समोर लोक जमले असताना आरोपी देवदास रोहिदास नरळे , पिंटु ऊर्फ शांताराम रोहिदास नरळे , संतोष गोपाळ शिंदे , जनाप्पा विठ्ठल शिंदे हे सर्वजण चर्चा करीत असतांना आरोपी यांनी संगणमताने फिर्यादीची आई श्रीमती शहिदा महादेव तुपे हिस मारहाण करुन तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते. अशीतक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होती.

सदर गुन्हयातील आरोपी देवदास रोहिदास नरळे , पिंटु ऊर्फ शांताराम रोहिदास नरळे यांना दि. २७ ऑगस्ट २०२३ रोजी अटक करण्यात आली होती. सदर गुन्हयातील फरारी आरोपी संतोष गणपत शिंदे व जनाप्पा विठ्ठल ऊर्फ विठोबा शिंदे यांचे शोधाकरीता म्हसवड पोलीस ठाणे कडील दोन पथके दोन दिवस शोध घेत होती त्यांना आज पहाटे यश मिळाले व फरारी आरोपीना अटक करून म्हसवड पोलीस ठाण्यात आणले व दुपारी एक वाजता म्हसवड न्यायालयात चौघांना हि हजर केले आसता ३१ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

दरम्यान गावात शांतता रहावी यासाठी म्हसवड पोलीसांनी गावात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!