ताज्या घडामोडी
कांद्यावर कर बसवून सरकार ला शेतकरी संपवायचा आहे का..? सर्वसामान्य,गोरगरीबांचे सरकार आणण्यासाठी सामुदायिक ताकत उभी करायची आहे -शरदचंद्र पवार
पाच जेसीबीच्या सहाय्याने पवार साहेबांच्या गाडीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला तर मोठ्या पोकल्यानेच्या सहाय्याने 12 फुटाचा 150 किलो वजनाचा हार पवार साहेबांच्या गाडीला घालण्यात आला
सभेदरम्यान कुकुडवाड गटातील युवक ,ज्येष्ठांनी दहिवडी सभेचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश युवक सर चिटणीस अभयसिंह जगताप व राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष विक्रम शिंगाडे सभास्थळी तब्बल २००हून अधिक गाड्यांचा ताफ्यासह . पवार साहेब आगे बढो च्या घोषणांनी सभा स्थळ दाखल झाले म्हसवड शहरातून ही युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष परेश शेठ व्होरा, तेजसिंह राजेमाने, किशोर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड शहरातून ही युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हसवड परिसर व कुकुडवाड गटातील युवकांचा उत्साह हा वाखाणण्याजोगा असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी दिल्या
(एल. के. सरतापे.म्हसवड)राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज माण मध्ये आले. दहिवडी मध्ये शरद पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या बंडानंतरची शरद पवार यांची माण मधली ही पहिलीच सभा होती. शरद पवार आजच्या सभेत काय बोलतात? याची सगळ्यांनाच उत्सुक्ता होती. कारण शरद पवार मागच्या आठवड्यात त्यांचे पुतणे अजित पवार यांना भेटले होते. त्यावरुन मोठ्या प्रमाणावर शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल राजकीय संभ्रम निर्माण करण्यात आला. त्यामुळे शरद पवार काय बोलणार….? याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागलं होतं.
दहिवडी येथील सभेच्या निमित्ताने उपस्थीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, खा श्रीनिवास पाटील,आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. रोहीत पवार , सुनिल माने,माण खटाव चे नेते प्रभाकर देशमुख, सारंग पाटील, राजकुमार पाटील, अभयसिंह जगताप, दहिवडी नगराध्यक्ष
माण तालुक्याच्या हद्दीवर मोगराळे घाटमाथ्यावर हजारो युवकांसाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या फटाक्यांच्या व घोषणाबाजीत साहेबांचे जंगी स्वागत प्रभाकर देशमुख, मनोज पोळ, श्रीराम पाटील, अभयसिंह जगताप सह हजारो कार्यकर्त्यांनी केले
सागर पोळ, नगरसेवक सुरेंद्र मोरे , महेश आढाव,पृथ्वीराज गोडसे, बंडू कोकरे,तेजस शिंदे राहुल सागर,अभय सिंह जगताप, दीपक पवार, मनोज पोळ, विक्रम शिंगाडे, हणमंत पाटील, शहाजी बाबर,, सातारा जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष सुरेश जाधव,माण काँगेस चे अध्यक्ष, बाबासाहेब माने, विश्वंभर बाबर, दिलीप तुपे,मनोज कुंभार, नगराध्यक्ष सागर पोळ, सुभाष शिंदे, हर्षदा देशमुख, राष्ट्र वादी माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, जय राजेमाने यांच्यासहित वडूज , दहिवडी चे नगरसेवक युवक पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .
राष्ट्रवादी फुटी नंतर प्रथमच माण तालुक्यात आलेल्या पवार साहेबांच्या स्वागताला व सभेला आज पर्यंतचे या पटांगणाच्या रेकार्ड ब्रेक गर्दी करण्यात देशमुख साहेब यशस्वी झाल्याची चर्चा सभा स्थळी होती