हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

शरद पवार यांचा दौरा यशस्वी करण्याची देशमुखांची कसोटी , भाजपाने नगरपंचायतींचा नारळ तृतीयपंथीच्या हस्ते केल्याने वादाची ठिणगी पडणार का…?

पक्ष फुटी नंतर पहिल्यांदाच शरद पवार साहेब यांचां माण तालुक्याचा दौरा

(एल .के. सरतापे)- म्हसवड माण तालुक्याचे राजकारण म्हणजे जिल्ह्यात चर्चेचा विषय होत असतो आज हि तसाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतर प्रथमच माण तालुक्यात येत असलेल्या ऐन दुष्काळी परिस्थितीत पाणी, चारा यांची टंचाई असताना होत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचा माण तालुक्यात होत असलेला आजचा दौरा व या दौर् निमित्ताने माजी कोकण आयुक्त व माण खटावची सर्व जबाबदारी दिलेले राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांचा हा दौरा म्हणजे एक प्रकारे परिक्षेचा काळ असून एका बाजूला राष्ट्रवादी फुटी मुळे कार्यकर्त्यातच दोन भाग झाले असून एक मोठे साहेब गट तर दुसरा दादा गट असे दोन गट झाले असले तर साहेब गटाकडे वा दादा गटाकडे कोण हे आजून उघड पणे कोण दाखवत नसल्याने आज होत असलेल्या साहेबांच्या दौर्यात कोण कोण उपस्थित राहणार हा एक प्रश्न असला तरी या दौर्याच्या निमित्ताने नगरपंचायतींच्या नुतन इमारतीच्या भुमि पुजनाची केलेली भाजपच्या पदाधिकारी यांनी स्टंटबाजीने दौरा वादग्रस्त ठरला असून या दौर्यासाठी मोठ्या प्रमाणात युवकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर खासदार शरद पवार यांनी राज्यभर विविध मतदारसंघात दौरे करुन पक्षाच्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचे काम करत आहेत. यातून भाजपसह अजित पवार गटावर ते सडेतोड टीका करत आहेत.आज शुक्रवारी सकाळी १० वाजता दहिवडी बाजार पटांगणावर ७० वर्षाचा यौध्दा खासदार शरद पवार पक्ष फुटी नंतर काय बोलणार, कोणावर बोलणार याची उत्सुकता लागली असून सभेत खासदार शरद पवार कोणावर निशाणा साधणार याची उत्सुकता आहे. पक्ष फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार शरद पवार यांचे जिल्ह्यात दौरा झालेला नाही रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त दहिवडीत थांबणार आहेत.ततपूर्वी मोगराळे घाट माथ्यावर पवार साहेबांचे हजारो तरुण युवकांच्या उपस्थित जंगी स्वागत ढोल ताशा च्या गजरात तेथून टु व्हीलर रॅलीचे बिजवडी मध्ये बचत गटाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत तेथून दहिवडी येथील रयत शिक्षण संस्थे मध्ये ५०० विद्यार्थी यांना सायकल वाटप व मार्गदर्शन त्यानंतर रयतने उभा केलेल्या अभ्यासिकेचे उदघाटन त्या नंतर नगर पंचायतीच्या नुतन वास्तुचे उदघाटन व त्यानंतर बाजार तळावर सभा असे कार्यक्रम होणार आसले तरी नगरपंचायतींच्या नुतन इमारतीचा श्रेय वाद उफाळून आला असून भाजपा पदाधिकारी म्हणतात भाजप आ जयकुमार गोरे यांनी मंजूर करुन निधी आणला असा दावा पुरावे देवून करत आहे तर सत्ता स्थानी असलेले पदाधिकारी मात्र साहेबाच्या दौर्याच्या आदल्या दिवसीच तृतीयपंथीच्या हस्ते भाजपा पदाधिकारी यांनी इमारतीचे उद्घाटन केल्याने आज पवार साहेब काय बोलणार
या सर्व राजकीय नाट्यमय घडामोडी झाल्यानंतर आता माण तालुक्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते संभ्रमित झाले आहेत काही कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही अजितदादाचे कार्यकर्ते आहोत म्हणतात. तर, काही जण आम्ही शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत असे म्हणत असले तरी कार्यकर्ता बाहेर पडण्यासाठी उत्साहि दिसत नसला तरी आज देशमुख साहेब यांना साहेबांच्या सभेला गर्दी जमवणे हि एक कसरत करावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!