गोखळी ( प्रतिनिधी) फलटण तालुक्याच्या पूर्व भागात गोखळी , खटकेवस्ती,आसू, पवारवाडी, हणमंतवाडी , साथ शिंदेनगर , जाधववाडी , ढवळेवाडी, साठे , राजाळे गावांच्या परिसरात. सर्दी, ताप डेंगी सदृश साथीच्या आजारी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.यामळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.यामध्ये शाळकरी लहान मुलांचा जास्त समावेश असुन आरोग्य खात्याने तातडीने खबरदारी घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. ऐन गौरी गणपती सणासुदीच्या दिवसांत सर्दी खोकला, ताप रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
खाजगी दवाखान्यात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने घर आणि आसपास दुर्गंधीयुक्त सांडपाण्यावर डांसाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने नागरिकांनी आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी गरज आहे गावपातळीवर आरोग्य खाते, ग्रामपंचायतीच प्रशासनाने रोग प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.