(जावली/ अजिंक्य आढाव)फलटण तालुक्यातील साठे फाटा येथे फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीकन्या यांनी नुकतेच शेतकऱ्यांना केळी या पिकातील मुनवे काढण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे.
ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत साठे फाटा ता. फलटण येथील शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी केळी पिकातील मनुवे काढण्याची दाखवून प्रात्यक्ष सर्व शेतकऱ्यांचा सहभाग होत.
केळी पिके ऊस पिकानंतर आर्थिक उत्पादनासाठी नगदी पीक म्हणून ओळखले जाते मुख्य केळीच्या पिकाच्या शेजारी मुनवे धारदार विळ्याने कापल्याने व त्यावर रॉकेल मिश्रित द्रवण टाकल्याने मुनवे मरतात त्यामुळे मुख्य पिकातील मनुवे तयार होवून अशी अन्नद्रव्य शोषणाची स्पर्धा होत असते ती कमी होऊन मुख्य पिकालाची सेंद्रिय व रासायनिक खते टाकलेली असतात ती मिळतात व त्यामुळे मुख्य केळी पिकाची वाट चांगली वजनदार म्हणून उत्पादनात दर्जेदार गुणवत्तापूर्वक केळीची घडाची वाढ होते.
कृषीमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु.डी.चव्हाण ,शिवाजीराजे उद्याविद्यान महाविद्यालय प्राचार्य एस.डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा.निलिमा धालपे कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा.नितीषा पंडित , प्रा. संजय आडत कृषी सहाय्यक वैभव निबांळकर, शंकर सस्ते, यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ऋतुजा माळवे, राजश्री पवार, अंकिता निंबाळकर, कल्याणी कोळी, प्रतिक्षा व श्रद्धा सस्ते , सृष्टी कुदळे यांनी सहभाग घेतला होता.