माहिती व तंत्रज्ञान
कृषिकन्यांकडून मठाचीवाडी येथील महिलांना केळीपासून चिप्स बनविण्याचे प्रशिक्षण
(अजिंक्य आढाव)-महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित कृषी महाविद्यालय फलटणच्या चतुर्थ वर्षातील कृषी कन्यांनी मठाचीवाडी गावातील महिलांना केळीचे चिप्स बनवण्याचे प्रशिक्षण नुकतेच दिले.ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प 2023-24 अंतर्गत सुमारे दहा आठवडे कृषी कन्या मठाचीवाडी गावात वास्तव्यास राहणार आहेत.
या कार्यक्रमांतर्गत शनिवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी मठाचीवाडी, तालुका फलटण येथील महिलांसाठी केळीचे चिप्स बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. घरगुती पद्धतीने कच्च्या केळीचे चिप्स कसे बनवण्यात येतात, व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याचे उत्पादन कसे घ्यायचे यावर कृषी कन्यांनी थोडक्यात माहिती दिली.
या कार्यक्रमात मठाचीवाडीच्या सरपंच सौ.जयश्रीताई भोसले समवेत गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हे प्रात्यक्षिक श्री.विकास चंद्रकांत जाधव यांच्या घरी सादर करण्यात आले. तसेच कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषी कन्या समृद्धी मोहिते,साक्षी शिंदे, हर्षदा लोखंडे, प्राजक्ता ननावरे, पूजा मारवाडी, शिवांजली धुमाळ, समृद्धी कुंजीर, समृद्धी उल्हारे या विद्यार्थिनींना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, कार्यक्रम समन्वयक प्रा.निलीमा धालपे,कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे,प्रा.नितिषा पंडित व प्रा.रश्मी नायकवडी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.